"चांदसी मेहबूबा हो मेरी कब ऐसा मैने सोचा था" या गाण्यापासून प्रेरणा घेउन ही कविता लिहीण्याचा प्रयत्न केला आहे... हा या गाण्याचा अनुवाद नसून या कवितेची केवळ प्रेरणा आहे याची कृपया नोंद घ्यावी...
एखादी
परी
माझीही
असावी
ध्यानी मनी तीच वसावी
ऐश्वर्या करीना नसली तरी
असावी साधी सरळमार्गी चालणारी || १ ||
नसेल शुक्राची चांदणी जरी
असावी गोड लाजरी हसरी
हजारो सुंदरी उभ्या जरी
तीवरच माझी नजर खिळवणारी || २ ||
निराळ्या अदेने मोहीत करणारी
साधेपणातही सुंदरता आणणारी
माझ्यात सलमान न शोधणारी
पण सलमानमधे मलाच पाहणारी || ३ ||
तीची प्रितच न्यारी असावी
हृदयी माझीच छबी रहावी
सीतेसारखी साथ तिने द्यावी
मलाही रामाची जाणिव व्हावी || ४ ||
न मानावे मला परमेश्वर
नजरेने झाकावे मनीचे अंतर
संस्कृतीची न सोडावी चकोर
असावी मानी अन् धुरंधर || ५ ||
नसावी तिला महालाची अपेक्षा
केवळ चैनीची नसावी अभिलाषा
दोहोंच्या विचारांची एकच दिशा
समाधानी जीवनाची बाळगावी मनिषा || ६ ||
हवी अशी एक स्वप्न-सुंदरी
सुख-दुःखात सोबत करणारी
कधी रुसणारी, कधी हसणारी
जन्म-जन्मांतरीची साथ देणारी || ७ ||
- जयराज
ध्यानी मनी तीच वसावी
ऐश्वर्या करीना नसली तरी
असावी साधी सरळमार्गी चालणारी || १ ||
नसेल शुक्राची चांदणी जरी
असावी गोड लाजरी हसरी
हजारो सुंदरी उभ्या जरी
तीवरच माझी नजर खिळवणारी || २ ||
निराळ्या अदेने मोहीत करणारी
साधेपणातही सुंदरता आणणारी
माझ्यात सलमान न शोधणारी
पण सलमानमधे मलाच पाहणारी || ३ ||
तीची प्रितच न्यारी असावी
हृदयी माझीच छबी रहावी
सीतेसारखी साथ तिने द्यावी
मलाही रामाची जाणिव व्हावी || ४ ||
न मानावे मला परमेश्वर
नजरेने झाकावे मनीचे अंतर
संस्कृतीची न सोडावी चकोर
असावी मानी अन् धुरंधर || ५ ||
नसावी तिला महालाची अपेक्षा
केवळ चैनीची नसावी अभिलाषा
दोहोंच्या विचारांची एकच दिशा
समाधानी जीवनाची बाळगावी मनिषा || ६ ||
हवी अशी एक स्वप्न-सुंदरी
सुख-दुःखात सोबत करणारी
कधी रुसणारी, कधी हसणारी
जन्म-जन्मांतरीची साथ देणारी || ७ ||
- जयराज