मी एक आशावादी
मनुष्य आहे...
जीवनात ज्याच्या सर्वाधिक दुःखच
आहे...
असे जरी असले
तरी,
मी आशेवरच तृप्त
आहे...
मी एक आशावादी
मनुष्य आहे...
चार दिवसांचे सुख
बाकी सारे दुःख
आहे...
पण त्या सुखांची
आठवणच
जगविण्यास
मला खूप आहे...
मी एक आशावादी
मनुष्य आहे...
बुडताना अजस्त्र लाटांमधूनी
काडीचाही मज आधार
आहे....
वेळ गेल्यावर का होईना
होईल सर्व ठीक,
देवाचाच मज आधार
आहे...
मी एक आशावादी
मनुष्य आहे...
आशावादी मनुष्य मी,
आशाच माझे बळ
आहे...
अंधारातून
मार्ग आक्रमताना,
आशेच्या किरणांचीच साथ आहे...
मी एक आशावादी
मनुष्य आहे...
आशेच्या त्या किरणांसंगे
आशेचा सुर्य रेखाटतो
आहे...
त्या सुर्याने तम संपावे
हीच एक आशा
आहे...
मी एक आशावादी
मनुष्य आहे...
- जयराज