अवखळ
मन
वाऱ्यासवे निघाले
दूर पल्याड रानावरी आले
पाहूनी हिरवी झाड-पाले
मन झाले पावसाने चिंब ओले ।। १ ।।
मन धावत पुढे आले
गोदा-भीमे तिरी विसावले
पाहूनी साधू संतांचे मेळावे
मन झाले पावसाने चिंब ओले ।। २ ।।
मन घोड-दौडतच राहिले
गड-किल्यांवरी पोहोचले
राजे मावळ्यांच्या आठवाने
मन झाले पावसाने चिंब ओले ।। ३ ।।
मन सैरभैर झाले
अनंत आकाशी उडाले
सांजेला घराच्या ओढीने
मन झाले पावसाने चिंब ओले ।। ४ ।।
- जयराज
दूर पल्याड रानावरी आले
पाहूनी हिरवी झाड-पाले
मन झाले पावसाने चिंब ओले ।। १ ।।
मन धावत पुढे आले
गोदा-भीमे तिरी विसावले
पाहूनी साधू संतांचे मेळावे
मन झाले पावसाने चिंब ओले ।। २ ।।
मन घोड-दौडतच राहिले
गड-किल्यांवरी पोहोचले
राजे मावळ्यांच्या आठवाने
मन झाले पावसाने चिंब ओले ।। ३ ।।
मन सैरभैर झाले
अनंत आकाशी उडाले
सांजेला घराच्या ओढीने
मन झाले पावसाने चिंब ओले ।। ४ ।।
- जयराज