तहानलेल्या
पाणी न मिळो
हा नियतीचा आवडता खेळ ।
अपेक्षा करावी अन्
भंग व्हावा
चपखल बसे हा
मेळ ।।१।।
काही योजावे, प्रयत्नही करावा
अन् शेवटी निराशाच
यावी ।
सर्वोच्च शक्तीने केला अन्याय
सांगा, फिर्याद कोठे करावी? ।।२।।
भावनेचा हा गुंता,
वाढतच जातो ।
"आधारस्तंभां"वर टेकून
रडावे
पण त्यांनाही त्रास नको ।।३।।
साथ नाही कोणाची
मिळालीच तर "खोटे"पणाची ।
तमा नाही वाटत
आता
फसविल्या गेल्याची ।।४।।
एकल्याचा मार्ग माझा
एकलाच आक्रमितो ।
"कर्मण्येवाधिकारस्ते"
श्लोक मनी आठवितो ।।५।।
मुस्कटदाबी
ही सारी
मुकेपणाने
सोसतो ।
अंंतरी जखमी जरी
स्मित ओठांवर राखितो ।।६।।
"आक्रोश"
मनी खूप झाला
आता शांतता ईच्छितो ।
अंधारात धडपडताना
साथ समईची मागतो ।।७।।
- जयराज
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा