जो बोलतो तुझ्याशी हृदयाने,
डोक्याने त्याच्याशी बोलू नको ।
सहज सांगतो गोष्ट ही सखे,
साधी समजून विसरु नको ।।
तू एक मुलगी आहेस (हा कमीपणा नाही, तर वास्तव आहे),
त्यातून खूप सुंदर आहेस ।।
डोळ्यात तुझ्या पाहून आसवे,
आधार खांदे बरेच येतील ।
पण एक लक्षात घे प्रिये,
शुध्द भावना त्यात किती असतील? ।।
समजून घे त्या आसवांचीही व्यथा,
आणि जमल्यास ते देणाऱ्याचीही कथा ।।
तुला मिळाला आधार जरी,
तो एकटाच झुरत असेल ।
डोळ्यांत तुझ्या अश्रुंच्या सरी,
तो ही एकांतात रडत असेल ।।
अनंत भावनांचे सार हे आसू,
दाटूनी का डोळ्यात आले? ।
बघ बोलून एकदा त्याच्याशी,
शब्द का तुझे मुके झाले? ।।
संवादाने अंतर मिटते,
विसंवादाने नाती ।
ज्याने केले प्रेम तुझ्यावर,
त्याची न व्हावी माती ।।
- जयराज
डोक्याने त्याच्याशी बोलू नको ।
सहज सांगतो गोष्ट ही सखे,
साधी समजून विसरु नको ।।
तू एक मुलगी आहेस (हा कमीपणा नाही, तर वास्तव आहे),
त्यातून खूप सुंदर आहेस ।।
डोळ्यात तुझ्या पाहून आसवे,
आधार खांदे बरेच येतील ।
पण एक लक्षात घे प्रिये,
शुध्द भावना त्यात किती असतील? ।।
समजून घे त्या आसवांचीही व्यथा,
आणि जमल्यास ते देणाऱ्याचीही कथा ।।
तुला मिळाला आधार जरी,
तो एकटाच झुरत असेल ।
डोळ्यांत तुझ्या अश्रुंच्या सरी,
तो ही एकांतात रडत असेल ।।
अनंत भावनांचे सार हे आसू,
दाटूनी का डोळ्यात आले? ।
बघ बोलून एकदा त्याच्याशी,
शब्द का तुझे मुके झाले? ।।
संवादाने अंतर मिटते,
विसंवादाने नाती ।
ज्याने केले प्रेम तुझ्यावर,
त्याची न व्हावी माती ।।
- जयराज
Sundar...
उत्तर द्याहटवाधन्यवाद... :)
उत्तर द्याहटवा