या पोस्ट मध्ये मी मला आवडलेले काही विचार देत आहे. हे विचार कदाचित एखाद्या लेखकाचे असतील, एखाद्या विचारवंताचे/थोर व्यक्तीचे असतील, एखाद्या सुभाषिताचा अर्थ असेल, कोणीतरी सहज बोलून गेलेलं वा कुठे तरी असच वाचलेलं असेल किंवा मग सहज माझ्या मनात आलेले असतील.
खरं तर हे विचार थोडे तत्वज्ञानाकडे झुकणारे असल्याने कोणाला तरी प्रवचन वगैरे वाटतील. त्यामुळे ज्यांना अशा "प्रवचनां"मुळे कंटाळा/झोप येत असेल तर त्यांनी हि पोस्ट पाहूच नये किंवा सरळ झोप येण्यासाठी म्हणून पाहावी, हि नम्र विनंती.
खरं तर हे विचार थोडे तत्वज्ञानाकडे झुकणारे असल्याने कोणाला तरी प्रवचन वगैरे वाटतील. त्यामुळे ज्यांना अशा "प्रवचनां"मुळे कंटाळा/झोप येत असेल तर त्यांनी हि पोस्ट पाहूच नये किंवा सरळ झोप येण्यासाठी म्हणून पाहावी, हि नम्र विनंती.
- संगीत आणि पुस्तकं तुम्हाला कधीही एकटं पडू देत नाहीत.
- Marry a Girl/Boy, who equally respect your parents as of her/his and should respect and love you as a person, who you are, irrespective of your appearance and wealth...
- कोणी काय गमावलं आणि काय कमावलं याच योग्य उत्तर केवळ काळच देऊ शकतो...
- काही घटना केवळ "एक दुःस्वप्न" समजून विसरायचा कितीही प्रयत्न केला तरी विस्मृतीत जात नाही...
Some incidences can not be erased from memory by just saying, it was a nightmare...
- वडीलधाऱ्या व्यक्तींचा आदर, सहनशीलता, क्षमा आणि समोरच्या व्यक्तीच्या ठिकाणी स्वतःला ठेऊन विचार करण्याची क्षमता हेच खरे अलंकार आणि मनुष्याला मन असण्याची लक्षणे आहेत.
- तुम्ही कितीही चांगले असलात तरी चर्चा केवळ एका वाईट प्रसंगाचीच होते... त्यामुळे कितीही वाईट प्रसंग उभा ठाकला तरी "सर्वांसमक्ष" आपला तोल ढळू नये यातच आपली खरी कसोटी असते...
- मनुष्य आपल्या चुका तेवढ्या झाकून ठेवतो आणि दुसऱ्याच्या चुका मात्र सर्वांना दाखवत सुटतो...
- ज्याप्रमाणे फुटलेले मोती लाखेच्या लेपाने जोडता येत नाहीत, त्याप्रमाणे अपमानाने तुटलेले प्रेम सांधणे, ईश्वरालाही शक्य नाही...
- संस्कृत सुभाषित
- मी एक वाईट मनुष्य असलो तरी एखाद्याचा राग शांत होण्यासाठी जन्मभर वाट नक्कीच पाहू शकतो...
- जेव्हढं घट्ट नातं, तेव्हढे तीव्र मानापमान... परक्या माणसाला आपलं प्रेमही देणं लागत नाही तसंच रागही...
- व. पु. काळे
- एकवेळ बुद्धिमान व्यक्तीशी स्पर्धा केली तर चालेल पण मूर्खांशी मैत्री नको...
- स्वामी विवेकानंद
- पुरुषांना पण व्यथा असतात... त्यांना त्यांच्यावर उत्कटतेने प्रेम करणारी व्यक्ती कायम हवी असते.. उडून जाणार अत्तर त्यांना पटत नाही...
- व. पु. काळे
- या जागात काय म्हटलंय यापेक्षा कोणी म्हटलंय यालाच जास्त महत्व आहे हे मला आता कळून चुकलं आहे...
- पु. ल. देशपांडे (असा मी असामी)
- धनाच्या जोरावर तुम्ही पदवीसाठी(Degree) प्रवेश घेऊ शकता, थोड्या फार प्रयत्नाने पदवीही(Degree) मिळवू शकता पण विचार करण्याची आणि ते मिळालेले ज्ञान वापरण्याची ताकद उपजतच असावी लागते किंवा मेहनतीने मिळवावी लागते.
- प्रश्न पडणे आणि त्यांची योग्य ती उत्तरं मिळवण्याची धडपड करणे हे "बुद्धी" असण्याची निशाणी आहे.
- घड्याळाचे काटे आणि समुद्राच्या लाटा कधीच कोणासाठीही थांबत नाहीत.
- गैरसमज हा कॅन्सर सारखा असतो... तिसऱ्या अवस्थेला पोहोचल्यावर तो आपलं स्वरूप प्रकट करतो...
- व. पु. काळे
आणि म्हणूनच त्याचे योग्य निदान प्राथमिक अवस्थेतच केले तर तो पसरतही नाही आणि होणारी हानी पण टाळता येते...
- आवडत्या व्यक्तीमुळे जर दुःख झालेच तर,
अ) दुःख महत्वाचे असेल तर व्यक्तीला विसरा.
ब) व्यक्ती महत्वाची असेल तर दुःखाला विसरा.
- माफ़ी मागितल्याने माफी मागणारा चुकीचा होत नाही तर नातं टिकवण्याची लायकी त्याच्याकडे जास्त आहे हेच सिद्ध होतं...
- एकदा का आपण समोरच्याला चुकीचं मानलं कि आपल्या चुकांकडे आपण दुर्लक्ष करतो किंबहूना आपलं काही चुकलंच नाही अशी आपली धारणा होते.
- खूप नशीबवान असतात ती लोकं ज्यांच्या जीवनात त्यांना समर्पित असलेली आपली माणसं मिळतात...
- ज्या व्यक्तीच्या जीवनात आपल्याला अजिबात स्थान किंवा किंमत नसते त्या व्यक्तीचा विचार करत राहण्यानेच खरं तर आपल्याला जास्त त्रास होतो... थोडंसं कटू पण शाश्वत सत्य...!!!
- Show respect even to people who don't deserve it, not as a reflection of their character, but, a reflection of yours.
- आपल्या मनातील भावना समोरच्या व्यक्तीपेक्षा त्या व्यक्तीशी आपल्या असलेल्या नात्याबद्दल असतात असे माझे प्रामाणिक मत आहे...
- Home is not Home without Dad and Mom.
- Never forget who was there for you, when no one else was.
- No one is busy in this world. It's all about Priorities.
- बोलून दुखावण्यापेक्षा अबोला धरण्याने माणूस जास्त खच्ची होतो.
- व. पु. काळे
- शब्द हे मानवाने वापरलेले सर्वात परिणामकारक औषध आहे...
Words are, of course, the most powerful drug used by mankind.
- Rudyard Kipling
- जीवनात काही दिवस मागे जाऊन काही गोष्टी ठीक करता आल्या असत्या तर किती बरं झालं असत नाही...?
- Distance doesn't matter, when roots of your relationship are strong enough.
- जुन्या काय आणि नव्या काय, घड्याळ्याच्या तबकड्या आणि पट्टे बदलतात... सुखाने टळलेली दुपार पाहायला तबकडी आणि पट्टे करायचेत काय...?
घड्याळाचं काय आणि माणसाचं काय, आतलं तोल सांभाळणार चाक नीट राहिलं कि फार पुढेही जाण्याची भीती नाही नि फार मागेही पडण्याची भीती नाही...
- पु. ल. देशपांडे (असा मी असामी)
- If someone trusts you blindly, don't prove them blind.
- परमेश्वरावर विश्वास ठेवा... त्यामुळे कधीही कोणत्याही गोष्टीसाठी हट्ट करू नका... त्या परमशक्तीचे आपल्याबद्दलचे प्रेम पण अजब असते कि ती गोष्ट आपल्याला मिळतेच... पण आपल्या कधी नशिबातच नसलेल्या गोष्टीला मिळवून पुढे कदाचित आपल्यालाच पश्चाताप वाटतो...
Trust Almighty... So, don't ask for "forced" favor from Almighty... Because, affection from Almighty towards us can favor for anything... But, we will may regret for such "not happening" favor...
- शिका, संघटित व्हा, संघर्ष करा...
- स्वामी विवेकानंद
- आता थोरा-मोठयांप्रमाणे माझ्या फार अशा काही मोठ्या महत्वकांक्षा नसल्या तरी अनेक वर्षांपूर्वी एका आषाढी का कार्तिकी एकादशीच्या दिवशी जसा मी या जगात आलो तसाच या जगाचा निरोप घेताना जगाला फारसा धक्का न लावता जाण्याची ईच्छा बाळगणारा असा मी एक असामी आहे...
- पु. ल. देशपांडे (असा मी असामी)
- Problem with a good book is that, you want to finish the book but, you don't want to finish the book.
- अभंग म्हणजे कधीही न भंगणारे... अशा या अभंगाच्या "देहाची तिजोरी" ते आत्ताच्या "माऊली माऊली" पर्यंत केवळ चाली बदलल्या... पण भाव आणि आर्तता मात्र तशीच राहिली.. कथा आणि कथाकार बदलले पण गाभा तोच राहिला... शरीर बदलले पण आत्मा तोच राहिला... आणि म्हणूनच अभंग हे नाव सार्थ आहे...
- May be if we tell people, the brain is an app, then, they will start using it.
- नात्यांचे धागे जर गरजेचे असतील तर टिकणार नाहीत आणि प्रेमाचे असतील तर तुटणार नाहीत.
- मित्र बनून प्रियकर बनण सोपं असतं...
प्रियकर बनून नवरा बनणं हे सुद्धा सोप्प असतं...
कठीण असत ते...
नवरा बनून प्रियकर राहणं आणि बायकोला मैत्रिणीसारखं समजून घेणं...
हे जेव्हा आणि ज्याला जमतं त्या नवऱ्याला "सुंदर दिसणाऱ्या मैत्रिणीची"
आणि बायकोला "समजून घेणाऱ्या मित्राची" गरजच भासत नाही.
- लागता है आज जिंदगी कुछ खफा है|
चालीये छोडीये कौनसी पहिली दफा है|
- गुलज़ार
- माझ्या चुका मलाच सांगा, लोकांना सांगू नका... कारण सुधारायचे मला आहे लोकांना नाही...
- प्रेम सर्वांवर करा पण त्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम करा ज्याच्या हृदयात तुमच्यासाठी तुमच्यापेक्षा जास्त प्रेम असेल...
- If you love someone, don't lie, open up, be honest, no secrets...
- प्रेम करण वाईट नाही, पण केलेलं प्रेम मान्य करण्याची हिम्मत नसणं नक्कीच वाईट आहे...
- भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे...
- श्री स्वामी समर्थ
- वो अफसाना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन,
उसे एक खूबसूरत मोड देकर छोडना अच्छा|
- साहिर लुधियानवी (गीत: चलो एक बार फिर से अजनबी बन जाये हम दोनो )
- जो तुमच्याशी हृदयाने बोलतो त्याच्याशी कधीही डोक्याने बोलू नका...
- जे प्रेम सत्य स्वीकारू शकत नाही ते खर प्रेमचं नसतं...
- मनुष्य केवळ सुखात साथ द्यायला जीवनसाथी हुडकत नसतो तर दुःखात पण तो आपली सावली बनून राहील अशी आशा बाळगून असतो...
- प्रेम, काळजी आणि अविश्वास यांत खूप अस्पष्ट असे अंतर असते. जे हे अंतर ओळखू शकतात ते सुखी होतात.
- दुःख दूर सारून जर मी स्वतः खंबीर राहू शकलो नाही तर जवळच्या माणसांना कसा आधार देणार?
- इतरांसमोर रडून तुम्ही तुमच्या चुकांवर पांघरून घालू शकता पण त्याच्या होणाऱ्या परिणामांवर नाही.
- साहित्य, संगीत किंवा एखादी कला यापैकी कशाचीच आवड नसलेला मनुष्य शेपटी नसलेल्या पशुसमान मानावा. केवळ तो गावात खात नाही हे पशूंचे परम भाग्यच.
- संस्कृत सुभाषित
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा