खरं तर माझं आणि विमानाचं प्रेम हे किती जगा-वेगळं आहे हे मला ओळखणाऱ्या लोकांना वेगळं सांगायची खरंच गरज नाही. मग ते जमेल तसं विमान प्रवास करणं असो वा मोबाइल, computer वर flight simulator game खेळणं असो. अजूनही मी Google Earth मधील Flight Simulator आवडीने खेळत असतो.
प्रत्येकालाच लहानपणापासून विमानाची, विमान-प्रवासाची आवड/craze ही असतेच. जमिनीवरून चिमटीत पकडता येईल असे वाटणारे विमान जवळून कसे दिसत असेल? खरंच विमानातून जमिनीवरील माणसं,इमारती मुंगी सारख्या दिसत असतील का? विमान-विमान करत हात दाखवणारी लहान मुले आणि कुतूहलाने वर पाहणारी माणसं विमानातून दिसत असतील का? असे अनेक प्रश्न मला-तुम्हांला सतत पडत असतील नाही? आता ज्यांनी विमानातून एकदा तरी प्रवास केला असेल त्यांना या प्रश्नांचं हसू येईल. पण तुम्ही स्वतः आठवून बघा, पहिल्या विमान प्रवासाची आपली अवस्था...
बरेच जण विमान प्रवास खर्चाचा म्हणून टाळतात, किंवा ऑफिस मधून कधी तरी मिळेलच या आशेवर असतात. पण खरे तर मी असा कधी विचार केलाच नाही. कारण, मला पहिली नौकरी लागली आणि काही महिन्यांच्या आतच मी माझा पहिला-वहिला विमान प्रवास केला, स्वखर्चाने. Thanks to my parents (या साठी मी माझ्या आई-वडिलांना धन्यवाद देईन). कारण त्यांनी कधी मला कोणत्याही गोष्टीचा अनुभव घेण्यापासून रोखलं नाही.
त्याच झालं असं, २० जून २०११ ला, मी एका लग्नासाठी म्हणून चंद्रपूरला गेलो होतो. आणि ते लग्न आटोपून मी २१ जून २०११ ला पाहिल्यांदा नागपूर ते पुणे (इंदोर मार्गे) असा विमान-प्रवास केला. खर तर सारंच अकल्पित होत.
याची सुरुवात अशी झाली कि, नुकतीच, म्हणजे मार्च २०११ ला, मला पहिली नौकरी लागली होती. आणि नवीन नौकरी असल्याने म्हणा किंवा तिथल्या एकूण सर्व खर्चाने म्हणा पण काही पैसे हातात शिल्लक राहिले होते. त्यावेळी ऑफिस मधील एक लग्न चंद्रपूरला होते आणि त्या लग्नाला, मैत्रीच्या नात्याने, जाणे अगत्याचे होते.
एका दिवशी अचानक डोक्यात असा विचार आला कि चंद्रपूर ते नागपूर अंतर पाहता आणि पुणे-नागपूर flight connectivity व किंमत पाहता एखादा तरी विमान प्रवास शक्य आहे. हा विचार मी पहिला माझ्या आई-वडिलांच्या कानी घातला आणि त्यांनी काही आढे-वेढे न घेता होकार दिला. मग प्रश्न होता कि तिकीट कसं काढायचं? पुलंच्या अपूर्वाई मधला तो प्रश्न माझ्यासमोर पण उभा राहिला. मग सुरुवातीला मीच थोडासा इंटरनेटचा आधार घेतला आणि मला किंगफिशर ची वेळ, route आणि सगळ्यात महत्वाचं "किंमत" (काय करू शेवटी मध्यमवर्गीय पडलो ना, किंमत आणि महिन्याच बजेट बघावचं लागतं) परवडण्यासारखी वाटली. सारं काही ठीक होत पण "तिकीट book करायचं कसं?" हा यक्ष प्रश्न होताच.
मग लग्न असलेल्या व्यक्तीलाच या संबंधी माहिती आणि विमान प्रवासाचा अनुभव असल्याने, तिकीट book करायला लावलं, अर्थात online payment माझ्याच card ने केलं. एकदाचं तिकीट book झालं. विंडो सीट पण घेतली. त्या वेळी याचे पैसे काही विमान कंपन्या घेत नसत. किंगफिशर त्यातलीच एक होती.
झालं, लग्न २० जून २०११ ला व्यवस्थित पार पडलं आणि मी लगेच दुपारी नागपूरकडे प्रस्थान केलं. मला हे सांगण्यात आलं होत कि नागपूर विमानतळ शहराबाहेर, अलीकडेच, आहे त्यामुळे मी ST कंडक्टरला विमानतळापाशी थांबवायला सांगितलं. तासाभरच्या प्रवासाने मी विमानताळापाशी आलो आणि ST गर्दीने गच्चं भरलेली असूनही कंडक्टर काकांनी मला व्यवस्थित उतरू दिलं आणि विमानतळाचा रस्ता पण सांगितला.
सारच नवीन असल्याने मी विमानतळा पर्यंत एक चक्कर टाकली आणि ते बाहेरून पाहून घेतलं. पण विमान दुसऱ्या दिवशी सकाळी ८:१५ वा. असल्याने आजची रात्र काढायची कुठं? हा एक प्रश्न डोळ्यांसमोर होताच. बरं, पहिलीच विमानतळ भेट असल्याने आत पण सोय होऊ शकते हे माहित नव्हतं. मग जवळच्या हॉटेल मध्ये रात्री मुक्काम केला. त्या रात्री खरं तर मला झोपच नाही आली.
२१ जून २०११ च्या सकाळी ६:३० वा. हॉटेल मधून बाहेर पडलो आणि त्यांनी मला विमानतळावर पोहोचवण्यासाठी गाडीची व्यवस्था पण करून दिली. खरं तर त्याची काही गरज नव्हती कारण, चालत ते विमानतळ केवळ १० मिनिटांच्या अंतरावर होत. पण मी आता विमानाच्या जगात होतो.
विमानतळावर आलो, बाहेर उभ्या पोलिसांना तिकीट आणि ओळख-पत्र दाखवून ६:३५ वा. आत चेक-इन काउंटर वर पोहोचलो. जूनचा काळ असल्याने बाहेर ढगाळ वातावरण आणि पावसाच्या हलक्या सरी होत्या. बोर्डिंग पास घेऊन लगेच सिक्युरिटी चेक (security check) साठी जाऊन उभारलो. देव-जाणे, ते सुरु झालं होत का नव्हतं. पण माझं security-check समोरची माणसे जशी वागत होती तसे सारे सोपस्कार करून, "आपला हा काही पहिला प्रवास नाही, असे बरेच प्रवास आपण केलेत", असे दाखवत झालं. कमरेचा बेल्ट, पाकीट, मोबाइल आणि एकमात्र माझी बॅग, ज्याला hand-baggage म्हणतात हे नंतर कळलं, असो, बाजूला करून केवळ बोर्डिंग पास हातात घेऊन पोलिसांसमोर उभा राहिलो. त्यांनी त्यांच्या हातातल्या मेटल-डिटेक्टर ने माझी आणि दुसऱ्या एकाने स्कॅनर मशीनने माझ्या इतर सामानाची चाचणी(test) घेऊन एकदाचा बोर्डिंग पास वर शिक्का मारला आणि मी आत waiting area मध्ये पोहोचलो.
आतापुढे काय झालं ते पुढील भागात.... क्रमशः ...
माझं विमान प्रेम : भाग २

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा