माझं विमान प्रेम : भाग १ वरून पुढे चालू...
तर नागपूर विमानतळावर, माझ्या पहिल्या बोर्डिंग पास वर शिक्का बसला आणि मी waiting room मध्ये येऊन बसलो.
तसा उत्तर गोलार्धातील उन्हाळ्याचा काळ असल्याने लवकर उजाडलेला दिवस, पण ढगांमुळे एक प्रकारचा पसरलेला काळोख, अधून-मधून होणाऱ्या हलक्या पावसाच्या सरी या साऱ्या गोष्टींकडे आता माझे लक्ष जाऊ लागले. ते आजू-बाजूला फिरणारे लोक, सफाई तसेच विमानतळावरील इतर कर्मचारी, पोलीस, थोडी-फार गर्दी असूनही विमातळावरील स्वच्छता, जाणवणारी गर्दीमधील शांतता, जाहिराती या साऱ्या गोष्टी अगदी नवख्या वाटत होत्या. थोडा वेळ या सर्व गोष्टींचं निरीक्षण करून झाल्यावर मी विमान कधी येणार याची वाट पाहात बसलो. त्याच वेळेस एक सूचना झाली, कि, पुण्याला जाणारे विमान हैद्राबादहून निघाले असून काही वेळात नागपूर विमानतळावर पोहोचेल. मनात धाक-धुक, थोडासा आनंद, थोडीशी भीती अशा साऱ्या संमिश्र भावना दाटू लागल्या.
अखेर स. ७:४५ च्या सुमारास किंगफिशरचे पुण्याला जाणारे अपेक्षित विमान विमानतळावर आल्याची घोषणा झाली आणि मनातील भावनांनी वेग पकडला. एरवी अपेक्षित गाडी आली कि बस अथवा रेल्वे फलाटावर होणारी धावपळ पाहता, इथे बोर्डिंग गेट समोर लागलेली रांग थोडीशी नवी आणि नजरेला विसंगत वाटत होती. मी हि त्या रांगेचा हिस्सा झालो. पुन्हा एकवार बोर्डिंग पासची आणि सामानाला(hand baggage) ला लावलेल्या टॅग ची तपासणी झाली आणि गेट मधून बाहेर पडलो.
आणि हीच ती वेळ होती जेव्हा सर्वप्रथम विमानाचे इतक्या जवळून दर्शन होणार होते. नागपूर विमानतळ फार मोठे नसल्याने बसने विमानापर्यंत जावे लागले नाही, बहुतेक, कि बसनेच गेलो, लक्षात नाही. पण विमान जवळून पाहताना "अगा मी ब्रह्मची पाहिले" अशी काही माझी अवस्था झाली होती. विमान ATR-७२ प्रकारचे होते.
आत प्रवेश करताना हवाई-सुंदरीने हसून नमस्कार करून स्वागत केले, त्याचा स्वीकार करत मी माझे आसन शोधायला निघालो. आत २X२ आसन व्यवस्था होती. विमानाच्या आत चालण्यासाठी (आणि आसनावर बसण्यासाठीही, हे नंतर कळलं ) थोडीशी कमी जागा असते हे जाणवतं. माझा नंबर, ९D बहुतेक, पाहून मी तिथे पोहोचलो तर आधीच एक महाशय खिडकीत बसून होते. आता नंबर आसनावर नसून वरती केबिन लगेज कंपार्टमेंट वर असल्याने, मी गोंधळून पुन्हा मागे उभ्या असलेल्या हवाई सुंदरीपाशी गेलो आणि तिकीट चेकेरला विचारावे तसे माझे आसन हुडकून देण्याची विनंती केली. तिने पण तत्परता दाखवत त्या महाशयांना उठवून बाजूच्या आसनावर बसण्याची विनंती केली व मला माझी खिडकीतली जागा मिळाली. त्या आनंदात मी, सामान वरती ठेवून, बाहेर बघतचं होतो कि माझ्या पोटात एकदम गोळाच आला. कारण माझी जागा नेमकी विमानाच्या पंख्या जवळ आली होती. तसा पंखा झाकलेला असला तरी इतका मोठा गोलाकार भाग त्याची जाणीव करून देतच होता. विमानाचे इंजिन सुरु असल्याने आत एकप्रकारचा, भुंग्याच्या आवाजासारखा, आवाज घुमत होता.
आता प्रश्न होता सीट-बेल्टचा. तो बांधायचा कसा? सगळे अजून स्थिर-स्थावर झाले नव्हते, ती संधी साधून मी त्या बेल्टचे निरीक्षण करू लागलो. बाजूच्या मनुष्याच्या ते लक्षात येऊ न देणे, हेही अपरिहार्य वाटत होतं, त्यामुळे निरीक्षणात काही अडचणी येत होत्या.
काही वेळात सारे स्थिर-स्थावर झाले आणि विमानाचा दरवाजा बंद केला गेला. आपापले मोबाइल, लॅपटॉप आदी इलेक्ट्रॉनिक सामग्री बंद करण्याची सूचना सर्वप्रथम झाली. मग विमानाच्या चालकाचा(Pilot) आवाज घुमला. त्याने स्वतःचे नाव, विमानाची थोडीशी माहीती, सध्याचे बाहेरचे तापमान आदी माहिती दिली आणि विमान हळू-हळू धावपट्टीकडे निघाले.
या वेळात, हवाई-सुंदरी काही सूचना देऊ लागल्या.
उदा. विमानास किती दरवाजे आहेत, त्यापैकी आपात्कालीन किती, आपत्कालीन स्थितीत काय करायचे, आसनाचा पट्टा कसा लावायचा व काढायचा इ. इ. त्या सूचना माझ्यासाठी नवीन असल्याने मी लक्ष देऊन ऐकल्या आणि सगळ्यात महत्वाचं सीट बेल्टचं नीट समजून घेतलं. न जाणो बेल्ट नीट बसला नाही तर विमानाने हवेत उड्डाण केलं कि मी पण हवेत जायचो या भीतीने तो नीट आवळून बांधला आणि नंतर निघतोय का ते बघायला म्हणून काढून पण बघितला. खात्री झाल्यावर पुन्हा व्यवस्थित बांधला, (काSहि अवघड नसतं बरं का हे) आणि पुढील प्रवासाची आतुरतेने वाट पाहू लागलो.
या काळात, साऱ्या सूचना झाल्या आणि आमचे विमान धावपट्टीवर येऊन पोहोचले.
उड्डाणाची मजा पुढील भागात... क्रमशः ...
माझं विमान प्रेम : भाग ३

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा