कधी कधी जीवनात अशीही एक वेळ येते जेव्हा आपण खूप खचून जातो. आपली चूक काय हे जरी आपण जाणत असलो वा नसलो, ती चूक किती मोठी आणि त्याची कारणं काय तसेच ती चूक नसून तो एक भावनांचा फुटलेला बांध होता किंवा पूर्वी आपल्या सोबत घडलेल्या कृतींची केवळ एक प्रतिक्रिया होती, हे जर आपण कोणाला सांगू शकत नसलो, तर मग "तोंड दाबून बुक्यांचा मार खात" आपले मन, जीवन निराशेच्या आहारी जाते आणि जसे व. पु. म्हणतात, "मन उदास असलं म्हणजे सोयीतल्या उणीवाच जास्त बोचायला लागतात" तशी काहीशी मनाची अवस्था होते.
अशा वेळेस खरं तर मनुष्य आधाराची जागा शोधू लागतो. भावनेचा आधार, मानसिक शांती मिळविण्यासाठी धडपड करू लागतो. काही लोक त्या बाबतीत खूप भाग्यवान असतात. त्यांना या गोष्टी सहज उपलब्ध होतात. कधी आपल्या मित्रांमार्फत किंवा नातेवाईकांमार्फत... इथे, भाग्यवान असण्यात, चूक कोणाची हा मुद्दा नसतो. केवळ त्यांना सहजगत्या आधार मिळून जातो इतकंच. पण सर्वच जण अशी भाग्यवान नसतात आणि खासकरून जी भावनाप्रधान लोकं असतात त्यांच्या बाबतीत, का कोणास ठाऊक पण, नेमका विपरीत अनुभव येतो. ते म्हणतात ना, "तहानलेल्या पाणी न मिळो, हा नियतीचा आवडता असे खेळ", तसेच काहीसे...!!!
भावनाप्रधान व्यक्तींच्या भावना जितक्या ठळकपणे दिसून येतात तितकेच त्यांना आपल्या दुखावलेल्या भावना लपविणे खूप अवघड जाते. कित्येकदा अनेक भावनाप्रधान व्यक्ती आपल्या भावना उघडपणे व्यक्त करायला लाजतात किंवा करु नाही शकत. पण दुखावलेल्या भावना लपविणे त्यांना कठीणच जाते.
येथे भावनाप्रधान व्यक्ती म्हणजे जिच्या डोळ्यात चटकन पाणी येते किंवा जी रडते असे न घ्यावे. मुळात, जी व्यक्ती रडते ती भावनाप्रधान असते असे म्हणणे चुकीचे ठरेल, असे मला वाटते. सर्वांसमक्ष रडणे हे अपराधीपणाचे द्योतक आहे, असे माझे स्पष्ट मत आहे. मोठ-मोठे अपराधी गुन्हा पकडला गेला कि धाय मोकलून रडतात ते काय भावनिक होऊन? त्यांनी केलेला अपराध अन् त्यापेक्षा तो पकडला गेला हि भावना त्यांना धाय मोकलून रडवते.
भावनाप्रधान व्यक्ती अशी असते जिच्या डोळ्यात चटकन पाणी तर येतेच पण ती व्यक्ती ते पाणी सर्वांसमक्ष शिताफीने लपविण्याचा प्रयत्न करते आणि जेव्हा एकांत मिळतो त्यावेळेस त्या साचलेल्या भावना अश्रूंच्या रूपात बाहेर काढते. कोणाच्याही नकळत...!!!
पण आज-काल खोट्याचा इतका बोलबाला झाला आहे कि, एखाद्याने रडून काही सांगितले कि त्या व्यक्तीचे खोटे पण आपणांस खरे वाटू लागते अन् त्याचाच फायदा काही खोटारड्या व्यक्ती घेतात आणि आपली कशी चूक नाही किंवा आपण किती स्वच्छ आहोत, हे भासविण्याचा, थोडक्यात चूक असूनही कातडी बचाऊपणा करण्याचा, प्रयत्न करतात. "चमडी बचाओ" व्यक्तींसाठी तर सर्वांपुढे धाय मोकलून रडण्यापेक्षा साधा अन् सोपा दुसरा प्रभावी उपाय नाही. जाऊ दे, तो आपला इथला मुद्दा नाही.
अशा भावनाप्रधान व्यक्ती आपले दुःखी मन एखाद्या छंदात, कामात लावून ते दुःख विसरण्याचा प्रयत्न करत राहतात. पण जसे माझ्या प्रत्येक लिखाणातून व्यक्त होते कि नशीब, खोटी माणसं आपली चाल कशीही खेळू देत, पण शेवटी परमेश्वरापुढे त्या साऱ्या चाली व्यर्थ ठरतात. अन् मग अशा व्यक्तींच्या जीवनात अनपेक्षितपणे एखादी अशी व्यक्ती येते जी त्यांना समजून तर घेतेच आणि त्यांचे जीवन नाट्यमयरित्या कलाटणी घेते. गरज नाही कि ती व्यक्ती जवळचीच कोणी असावी. कदाचित एखादी अनोळखी व्यक्तीही असू शकते, जी अशा प्रसंगाने आयुष्यात येते अन् आयुष्याचा भाग बनून जाते. काहींना हा नशिबाचा खेळ वाटतो पण मी नशिबाला परमेश्वराचा अधिकारी या रूपात पाहतो. म्हणजे परमेश्वर राजा आणि नशीब अधिकारी. राजा आज्ञा देणार. नशीब ऐकणार. कधी कधी नशिबाला आपला क्रूर अधिकार वापरायची, तहानलेल्या पाणी न मिळो सारखी, हुक्की येते पण राजाज्ञेपुढे काही चालत नाही.
ती व्यक्ती त्या भावना केवळ समजूनच घेते असं नाही तर त्यांचा आदर करते, ज्याची त्या भावनाप्रधान व्यक्तीस अतिशय गरज असते. कारण ती व्यक्ती अशा वेळेस जीवनात येऊन आपला हात पकडते जेव्हा आपण साऱ्या आशा सोडून दिलेल्या असतात. आपल्या चूका, गतकाळ याच्याशी काही घेणं-देणं न ठेवता ती व्यक्ती केवळ आपले मोडलेले मन पाहते आणि ते सावरायला आपल्याला मनापासून मदत करते. यात त्या व्यक्तीचा स्वार्थ किती असतो हा वेगळा मुद्दा. पण जी भावनेची उभारी, आशेची एक किरण आपल्या हताश मनाला मिळते ती खूप वेगळी आणि महत्वाची असते.
फार जुनी गोष्ट आहे. एक मनुष्य आपल्या व्यापारात तोटा झाला म्हणून आत्महत्या करायला म्हणून जातो. पण त्या कड्या जवळ त्याला दुसरा एक माणूस दिसतो आणि तो त्याला आत्महत्या करण्यापासून रोखतो आणि त्याला स्वतःची ओळख देताना म्हणतो, "मी बेंजामिन फ्रँकलिन (एक जुने जगप्रसिद्ध उद्योगपती) आहे आणि हा $१,००,००,००० (एक कोटी डॉलर्स) चा चेक घे आणि तुझा तोटा व कर्ज भरून काढ...!!!" तो मनुष्य या घटनेने खूप प्रभावित होतो आणि लगेच चेक वटवण्याऐवजी तो चेक तो भविष्यकाळासाठी ठेव म्हणून ठेवतो. "काही झालं तरी हा चेक आहे मदतीला" या एका "आशे"वर तो खूप जोमाने कामाला लागतो. सरतेशेवटी, त्याचे सारे कर्ज फिटून व्यापार पुन्हा भरभराटीला येतो. या आनंदात तो पुन्हा त्याच ठिकाणी बेंजामिन फ्रँकलिन यांना त्यांचा चेक परत देऊन धन्यवाद म्हणण्यासाठी जातो. त्याला ते तेथेच भेटतात. त्यांना तो चेक परत करणार इतक्यात एक वेड्यांच्या इस्पितळातील नर्स तेथे येते आणि त्याला म्हणते, "अहो हा एक वेडा आहे, आणि रोज इथे येऊन तो सर्वांना सांगत असतो कि मी बेंजामिन फ्रँकलिन आहे...!!!"
अशी हि आशेची गोष्ट...!!! जर एखादी खोटी आशा इतकं मोठं काम करू शकते तर विचार करा, खऱ्या आशेचे काय मोल...!!!
शेवट करताना इतकेच म्हणेन,
आज गुमनाम हूँ, तो फासला रखा है मुझ से ।
कल मशहूर हो जाऊँ तो, कोई रिश्ता न निकाल लेना ।।
एखाद्यासाठी आशेचा किरण बना, निराशेचे कारण नको...!!!
आशेचा किरण बनून माझ्या जीवनात आलेल्या खास व्यक्तींप्रती कृतज्ञपणे समर्पित...!!!

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा