विषय तसा नाजूक अन् गंभीर आहे. त्यामुळे मी मला आलेले अनुभव, आसपास घडणारे/घडलेले प्रसंग यांच्या माध्यमातून माझे विचार मांडायचा प्रयत्न करणार आहे. माझ्या विचारांशी सारे सहमत होतीलच असे नाही आणि सर्वांनी सहमत व्हावे अशीही अपेक्षा नाही. कदाचित माझे विचार चुकीचे वाटले तर दुरुस्त करावेत अशी आशा नक्कीच आहे...!!!
सुरुवात होते ते "शंका" अन् "संशय" वेगळे कि एकच यावरून... वरपांगी पाहता दोन्ही शब्दांचा अर्थ एकच वाटण्याची दाट शक्यता आहे. पण थोडासा खोलवर विचार केला तर कदाचित दोन्ही शब्दांतील सूक्ष्म फरक आपल्या ध्यानात येईल.
एखादी गोष्ट, घटना यांबद्दल प्रत्यक्षदर्शी अथवा साक्षी, पुरावे यांच्या आधारे विचारलेले, पडलेले प्रश्न म्हणजे "शंका" तर अपरोक्ष घटनांचा संबंध जोडून आलेले प्रश्न म्हणजे "संशय" असं मला वाटतं...!!!
आता वरील वाक्य/विचार यांचा थोडा उहापोह करतो... कारण "शंका" आणि "संशय" यांच्यामधील गल्लत दूर झाली तरच पुढे "बदनामी" विषयी आपण बोलू शकू...!!!
आता असं बघा, शाळेत शिक्षक आपल्याला काही शिकवतात आणि नंतर विचारतात, "काही शंका असतील तर विचारा." तसेच पोलीस जेव्हा गुन्ह्यातील सराईताला पकडण्यासाठी माग काढतात, तोसंशयावरून. मी सराईत असा शब्द मुद्दामहून वापरला कारण सहजासहजी कोणताही पुरावा मागे न ठेवता किंवा पुरावे नष्ट करतच काम करण्याची त्याची पद्धत असते. अशावेळेस पोलीस सुरुवातीला "तुम्हांला कोणाचा संशय?" असा प्रश्न विचारतात आणि "संशयिताला" पुढील तपासासाठी बोलावले जाते.
जर उपरोक्त उदाहरणांचा नीट विचार केला तर असं लक्षात येईल, जेव्हा शिक्षक विद्यार्थ्यांना शंका विचारायला सांगतात, तेव्हा त्यांनी विद्यार्थ्यांना तो पाठ पुराव्यानिशी दाखवून, पडताळलेला असतो. येथे पुरावा म्हणजे प्रमेय ( Theorems), प्रयोग (Experiments) इत्यादी, असे घ्यावे. याउलट, जेव्हा पोलीस संशयाबद्दल विचारतात, तेव्हा आपल्याकडे पुराव्यांपेक्षा अपरोक्ष किंवा कोणीतरी सांगितलेली गोष्ट किंवा विपरीत (संशयास्पद) हालचाल यांपलीकडे फारसे काही नसते.
याचाच सरळ अर्थ असा कि, शंका हि तेव्हाच घेतली जाते जेव्हा आपल्याकडे काही परिस्थितीजन्य पुरावे उपलब्ध असतात पण संशयास असा आधार गरजेचा नसतो. थोडक्यात, "कोणीतरी कान भरले" तर "हलक्या कानाचे" होणे म्हणजे "संशयी" आणि जे समोर आहे त्यानुसार प्रश्न करणे म्हणजे "शंका" असे मला वाटते. आता हे आपण आपल्या बुद्धीच्या आणि तर्कांच्या आधारे पडताळून पाहावे.
संशयावरून शंका येणे हे बुद्धीस पटण्यासारखे आहे पण शंकेवरून संशय घेणे हे शंका निरसनाची पद्धती, व्यक्ती आणि त्याच्या खरे-खोटे बोलण्याचा इतिहास तसेच शंकेचे दिलेले स्पष्टीकरण यांवरून ठरते.
संशय आला म्हणून पुरावे गोळा करणे आणि मग त्या पुराव्यांवरून शंका घेणे किंवा त्यांचे स्पष्टीकरण मागणे चुकीचे ठरेल काय? हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण माझ्या दृष्टीने म्हणाल तर, वरपांगी दिसणारा संशय दूर करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. असा संशय भयंकरच असतो. जसे व. पु. म्हणतात,
"संशय हा कॅन्सर सारखा असतो. तिसऱ्या अवस्थेत तो आपले खरे स्वरूप प्रकट करतो."
त्यामुळे, संशय आला तर तो प्रथम दूर करणे गरजेचे असते. पण संशयाने कोणावरही आरोप करण्यापूर्वी शंकेस जागा घेण्यासारखे काहीतरी आपल्या हाती असणे गरजेचे असते. अन्यथा, विनाकारण एखादी व्यक्ती दुखावली जाऊ शकते.
तसेच, कोणी शंका (आता शंका म्हणजे काय हे वर सांगितल्याप्रमाणे साक्षी, पुरावे आदी. परिस्थितीजन्य पुरावे) घेतलीच तर त्या व्यक्तीचे शंका निरसन व्यवस्थितपणे, कसलाही आतातायीपणा न करता, अहंकार न बाळगता करणेही गरजेचे असते.
शंकेचे निरसनच असे करावे कि पुढे शंका घेण्यास जागा राहू नये. संशयास मात्र अंत नसतो. तसेच शंकेस संशय म्हणून नाकारणेही चुकीचेच...!!!
या शंकेविषयी मी माझ्या जुन्या, शिक्षण : समज आणि गैरसमज , या लेखात काही उदाहरणं दिली आहेत ती एकदा जरूर पाहावीत.
माझ्या मते या भागापुरतं इतकं पुरेसं होईल. हे विचार पटले नसतील तर पुढे "बदनामी" यावरचं माझं विवेचन पटणार नाही. ज्यांना हे विचार पटले त्यांसाठी मी "शंका, संशय आणि बदनामी : भाग २" लिहणारच आहे. पण ज्यांना नाही पटले त्यांनी अवश्य कळवावे. चू. भू. दे. घे.
क्रमश:...
शंका, संशय आणि बदनामी : भाग २

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा