शंका, संशय आणि बदनामी : भाग १ वरून पुढे...
तर मागील भागात आपण शंका आणि संशय जाणून घेतले आता पुढचा भाग "बदनामी" पाहू...!!!
खरं पाहता बदनामी हा विषय पूर्णतः वेगळा असला तरी बहुतांश प्रमाणात त्याचा संबंध संशयाशी येतो. कसा ते पाहू...!!!
समजा, आपण कोणाला तरी, काही कामानिमित्त म्हणा किंवा सहज आठवण आली म्हणून म्हणा, फोन केला आणि तो बिझी (busy) लागला. आपला कॉल (call) आलेला पाहून, नंतर जर त्याने स्वतःहून कॉल केला तर ती व्यक्ती आपली कदर करते हे लक्षात येतं. पण काही कारणाने नाहीच जमलं त्या व्यक्तीस आपल्याला कॉल करणं (होऊ शकत असं कधीतरी, पण नेहमीच होऊ लागलं तर तो एक सूचक इशारा आपण मानू शकतो. कोणता सूचक इशारा हे सुज्ञास सांगणे न लागे. असो.) आणि म्हणून पुन्हा थोड्या वेळाने आपण फोन केला आणि त्याने तो उचलला तर आपण सहज विचारून जातो, "मघाशी पण फोन केला होता. पण busy लागला." व्यक्ती अगदीच जवळची असेल तर मग, "कोणाशी बोलणं चालू होतं?" असंही विचारतो कदाचित. तसेच "घरी पोहोचताच फोन अथवा message कर." असे आपण बोलून जातो.
आता वरील वाक्यांतून कोणाला ती काळजी वाटेल तर काहींना संशय...!!!
वरील दोन्ही वाक्यात आपल्या हाती पुरावा असा काही नाही. त्यामुळे तो संशय कि काळजी हे प्रसंगानुरूप ठरू शकेल. केवळ वाचण्याचा स्वर (tone) बदलून पहा, म्हणजे मी काय म्हणतो ते लक्षात येईल.
त्यामुळे एखाद्याला संशयीच ठरवायचं असेल तर वरील वाक्यं फक्त स्वर बदलून त्याच्या तोंडची म्हणून सांगितली कि त्यांचा अर्थ किती बदलतो आणि विचारणारा व्यक्ती "संशयी" म्हणून "बदनाम" होतो.
बघा हं, म्हणजे ज्या वाक्यांचा आधी "इतकी काळजी करणारा /री कोणी असेल का?" असा अर्थ काढला जात असेल, तो आता सरळ "विश्वास नव्हता, म्हणून असे विचारत होता /ती" असा बनतो/लावला जातो.
मी पुन्हा सांगतोय, कदाचित प्रसंगानुरूप हे बदलूही शकते पण हा (वरील) अर्थाचा/निष्कर्षाचा प्रवास जर "काळजी ते अविश्वास" असा असेल तर यात चुकीचे कोण? विचारणारा की निष्कर्ष काढणारा?
वरील प्रश्नांची उत्तरं खरं तर शंका आणि संशय यावर अवलंबून आहे. "काळजी ते अविश्वास" हा प्रवास, प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे, शंकेमुळे झाला कि संशयाने हे जाणून घेणे महत्वाचे ठरेल.
संशयाने झाला असेल तर ती विचारणाऱ्याची चूक आणि शंकेने झाला असेल तर निष्कर्ष काढणाऱ्याची असे माझे स्पष्ट मत आहे.
कारण मी मागील लेखात म्हणालो तसे, "शंकेचे निरसनच असे करावे कि पुढे शंका घेण्यास जागा राहू नये. संशयास मात्र अंत नसतो." त्यामुळे "शंके"मुळे झालेला हा प्रवास हेच सिद्ध करतो कि, निष्कर्ष काढणारा, विचारणाऱ्याच्या शंकेचे निरसन करण्यात अपयशी ठरला.
संशयाने शंका, शंकेने संशय अशा दुष्ट चक्रात अडकणे वाईटच...!!! अगदी चकवा मागे लागल्यागत अवस्था...!!! त्यामुळे, शंका निर्माण झाली तर त्याचे योग्य निरसन हाच एकमात्र उपाय आहे. असा उपाय करत असताना प्रसंगी आपला अहंकार, ताठा, बडेजाव आदी गोष्टी बाजूला सारून व्यक्तीला अथवा व्यक्तीसोबतच्या आपल्या नात्याला महत्व द्यावे, असे मला वाटते.
नात्यासाठी कमीपणा घेणे अथवा सरळ नात्याला शरण जाणे हे परमेश्वराला शरण जाण्याइतकेच महत्वाचे आहे आणि कोणत्याही परिस्थितीत नातं टिकवणं हीच नात्याची खरी कदर असते.
शंका निरसन करणे म्हणजे "खोट्या शपथा घेणे" अथवा "एक खोटे लपविण्यासाठी १० खोटे बोलणे" असे नव्हे. तसेच आतातायीपणा करत, विश्वासाच्या नावाखाली स्वैराचार करण्याची परवानगी मिळवणे असेही नव्हे.
एखाद्यास संशयी ठरवायचंच म्हटलं की, त्याच्या तोंडच्या वाक्यांना थोडासा मसाला लावणे किंवा त्यांचा स्वर बदलणे आणि सगळ्यात सोपं म्हणजे, त्याची वाक्यं अर्धवट सांगणं. इतकं केलं कि, समोरचा बदनाम होतोच. आता मी बदनाम कसं करायचं हे नाही सांगत आहे तर नाहक बदनाम कसं केलं जातं हे सांगतोय. थोडंसं पाहिलेलं, थोडंसं अनुभवलेलं...!!! पण हे सत्य नसतं.
वरील प्रतिमा (Image) केवळ एक उदाहरण म्हणून पहावी. यामध्ये घटना तुमच्यासमोर आहे आणि कॅमेऱ्यातून दिसणारी प्रतिमा म्हणजे जो त्रयस्थ व्यक्ती आहे त्याला सांगितलेली गोष्ट अशा अर्थाने...!!! यामध्ये कॅमेरा मुद्दामहून वापरला, म्हणजे तो दोन अर्थाने वापरता येईल.
१. त्रयस्थ व्यक्तीला सांगितलेला भाग
२. घटना समजून घेतल्यावर, त्रयस्थ व्यक्तीच्या मनातील विचार
त्यामुळे असं खोटं-नाटं सांगून एखाद्याची बदनामी केली गेली, तर जेव्हा सत्य समोर येते त्यावेळेस अशा लोकांची पळता भुई थोडी तर होतेच, पण तोंड लपवायलाही जागा उरत नाही. काळ हा अतिशय बलवान असल्याने सत्य कधी ना कधी समोर येतेच.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं ।
एखाद्याची बदनामी करायची कि नाही हे ज्याच्या त्याच्या सद्-सदविवेकबुद्धीवर आणि त्या व्यक्तीशी आपला असलेला जिव्हाळा यावर अवलंबून असते. आपल्या चुकांकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करून दुसऱ्यास बदनाम करणे आणि आपण निर्दोष असल्याचे सिद्ध करणे हा केवळ एक भ्रमाचा भोपळा आहे. उलट तो आपल्यावरच फुटण्याची जास्त शक्यता आहे.
एखाद्याची खोटी बदनामी करायला हिम्मत लागत नाही, हिम्मत लागते ती स्वत:च्या चुका मान्य करायला आणि त्या सुधारण्याला...!!!
आपली चूक/पाप लपवण्यासाठी, नाहक एखाद्यास बदनाम करण्यापूर्वी एकदा अवश्य विचार करा...!!!
काही चुकले असल्यास, आवडले नसल्यास अवश्य कळवा...!!! चू. भू. दे. घे.
जिस दिल में बसा था प्यार तेरा,
उस दिल को कभी का तोड़ दिया, हाय, तोड़ दिया ।
बदनाम न होने देंगे तुझे,
तेरा नाम ही लेना छोड़ दिया, हाय, छोड़ दिया ।।

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा