कवी भूषण यांनी, "ब्रिज/ब्रज" भाषेत, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या स्तुती-काव्याचा, मी थोडक्यात येथे, अर्थ सांगण्याचा प्रयत्न करत आहे.
शेवटच्या २ कडव्यांचा अर्थ वाचताना लागू शकतो पण पहिल्या दोन कडव्यांसाठी मला इंटरनेट (Internet) चा आधार घ्यावा लागला. शब्दार्थापेक्षा भावार्थ समजून घ्यावा हि विनंती आणि काही दुरुस्ती आढळल्यास कळवावे.
इन्द्र जिमि जृंभ पर, बाड़व सुअंभ पर
रावण सदंभ पर रघुकुल राज है ।।
पवन बारि बाह पर, संभु रति नाह पर
ज्यों साहस बाह पर राम ध्वज राज है ।।
दावा दृम दण्ड पर, चीता मृग झुण्ड पर
भूषण वितुण्ड पर जैसे मृग राज है ।।
तेज तम अंस पर, कान्हा जिमि कंस पर
त्यों म्लेच्छ बंस पर सेर सिवराज है ।।
अर्थ:
इंद्र जसा दानवी शक्तींवर, वामन जसा बली (हिरण्यकश्यपुचा वंशज) वर, रघुकुलाचा राजा (प्रभू श्रीराम) जसा रावणावर, शंभू जसा रतीच्या पतीवर (कामदेवावर), परशुराम जसा सहस्त्राजुनावर, वणवा जसा जंगलातील झाडांवर, चित्ता जसा हरणांच्या अन् सिंह जसा हत्तींच्या कळपावर, प्रकाशाचा किरण जसा अंधारावर, श्रीकृष्ण जसा कंसावर प्रभाव टाकतो (हावी होतो), तसा प्रभाव, भूषण सांगतो, शूर शिवाजी राजाचा मुस्लिम पातशाहींवर पडतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा