शुक्रवार, २८ एप्रिल, २०१७

काव्य : समझो मोहब्बत

पहली बार हिंदी और उर्दू शब्दों से काव्य बनाने की कोशिश की है। आशा है, आप सभी को पसंद आये। कुछ गलतियां और कमी दिखाई पड़े तो कृपा करके माफ़ कर देना और मुझे जरूर बता देना।




क्यों करते हैं कुछ लोग मोहब्बत? 
जो इसे समझ तक नहीं पाते ।
बदनाम हो ज़ाती है नाम से मोहब्बत,
जहाँ गलतियाँ ये कर जाते ।।१।।

"हम आपसे करते हैं प्यार",
हैं नहीं ये केवल अलफ़ाज़ ।
बिना जाने मत करो इक़रार,
समझो पहले, भावनाओं की आवाज़ ।।२।।

गुलामी है ये दिलों की,
न केवल हुस्नवालों की ।
ना सोने की ना दौलत की,
बंदगी है ये दिलवालों की ।।३।। 

मोहब्बत है नूऱ-ए-खुदा,
न दूजा कोई, इस से बड़ा ।
आग का दरिया भी, हो आगे खड़ा,
साथ-ए-हमसफ़र, डूब के जाना पड़ा ।।४।।

मत करो अपने पे गुरूर,
मोहब्बत में झुकना है जरूर ।
न हो अगर कोई झुकनेवाला,
खुदा का आशीष, क्या ले पायेगा भला? ।।५।।

होता है यह दिलों का संगम,
दो शरीर नहीं, मिलते यहाँ दो मन ।
ऐसी होती है ये लगन,
जिसमें मीरा भी मगन,
और राधा भी मगन ।।६।।

अभी तो समझो नादाँ यारों, 
कहती है ये दिशाएँ चारो ।
अगर हो दिल, सच्चा और पाक,
मोहब्बत कैसे हो सकती है नापाक? ।।७।।

---- जयराज 



सोमवार, २४ एप्रिल, २०१७

स्वामी तारक मंत्र

"भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे" असे म्हणत "निष्काम कर्माचे" अन् "श्रध्दा असावी पण अंधश्रध्दा नाही" हे ठणकावून प्रसंगी रागावून सांगणारे पण त्या रागातही अतोनात प्रेम असणारे स्वामी समर्थ यांचा "स्वामी तारक मंत्र" येथे देत आहे. 

प्रथमतः हे लक्षात घ्या कि या मंत्राने स्वामी धाऊन येत नाहीत कि या मंत्राचा जाप केल्याने स्वामींचे दर्शन होते असाही दावा नाही. त्यामुळे या मंत्राची पोपटपंची करण्यापेक्षा या मंत्राचा अर्थ समजावून घेत म्हटले किंवा अखंड मनात घोळवत राहिला तर जो आत्मविश्वास जाणवेल तो शब्दांत वर्णन करणे अशक्य..!!! 

शुध्द मराठीत असलेला हा मंत्र काही ठिकाणी नाही जरी समजला तरी त्याच्या आजूबाजूच्या वाक्यांवरुन भावार्थ लावता येतो.

या मंत्रातून इतके लक्षात नक्की येईल कि आपण जे म्हणतो, "देवासारखे धाऊन आला/ली/ले" किंवा "माझं नशीब चांगलं होतं" आदि सर्व स्वामींच्याच लीला आहेत आणि त्यांनी आपल्याला न मागता, न सांगता अबोलपणे खूप मदत केली आहे. मदत त्यांनी केली पण कोणत्यातरी व्यक्ती अथवा वस्तू आदिंना निमित्त बनवून...!!! जसे प्रभू हनुमान नित्य म्हणत असतात, "कार्य तो प्रभू श्रीराम का है, मैं तो केवल निमित्तमात्र हूँ|" स्वामी नित्य आपल्या आजूबाजूलाच असतात. अगदी स्वामींच्याच शब्दांत सांगायचे झाले, तर ते म्हणतात, "हम गया नहीं| हम जींदा है|"

आणि सरतेशेवटी स्वामींचा एक संदेश पुन्हा सांगतो, "परमेश्वर निर्गुण आहे. पण मनुष्याला निर्गुणाचे ध्यान लावणे अशक्य म्हणून त्या परमेश्वराला सगुण अवतार घ्यावा लागतो." मग तो श्रीराम असो वा श्रीकृष्ण असो... जगदंबेचा असो वा सांब सदाशिवाचा... स्वामींचा असो वा आणखी काही...!!! त्यामुळे हा तारक मंत्र आपल्या ईष्ट देवाचा मानून चालण्यासही हरकत नाही. केवळ भाव अन् अर्थ समजणे महत्वाचे...!!!

चल तर मग पाहू, स्वामी तारक मंत्र...!!!


निःशंक हो, निर्भय हो, मना रे
प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे
अतर्क्य अवधूत हे स्मर तू गामी
अशक्यही शक्य करतील स्वामी ।।१।।

जिथे स्वामी पाय तिथे न्युन काय
स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय
आज्ञेविणा काळ ना नेई त्याला
परलोकही ना भिती तयाला ।।२।।

उगाची भितोसी भय पळू दे
जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे
जगी जन्ममृत्यु असे खेळ ज्यांचा
नको घाबरु तू असे बाळ त्यांचा ।।३।।

खरा होई जागा तू श्रध्देसहित
कसा होशी त्याविण तू स्वामीभक्त
कितीदा दिला बोल त्यांनीच हात
नको डगमगू स्वामी देतील साथ ।।४।।

विभूती नमन नाम ध्यानादी तिर्थ
स्वामीच या पंच प्राणांमृतात
हे तिर्थ घे, आठवी रे प्रचिती
न सोडेल स्वामी ज्या घेई हाती ।।५।।

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ..!!!
जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ...!!!

शनिवार, २२ एप्रिल, २०१७

कविता : चूक

खूप मोठी चूक केली,
कोणावर तरी विश्वास ठेऊन,
कोणाला तरी आपलं मानून,
अन् मनातल्या साऱ्या गोष्टी सांगून ।।

जीव लावून तुझं जाणं,
कदाचित सहन झालंही असतं ।
पण लावलेला जीव तोडून जाणं,
सावरणं खरंच अवघड असतं ।।

तुझ्या जाण्याने दिवस-रात्र, मी केवळ रडतोय ।
खरे प्रेम केल्याचीच, जणू किंम्मत मोजतोय ।।

दिसत नाहीत माझे अश्रु, आज ईथे कोणाला ।
माझ्या चुकिची मलाच शिक्षा, दोष न देतो कोणाला ।।

नाही मजला जाग ती आज, जेवायची अन् झोपायची ।
नाही मज ती शुध्दही आज, जगण्याची वा मरण्याची ।।

तुझे यायचे नाहीत रिप्लाय,
ते मला जागे ठेवायचे ।
आज नाहीस तू माझ्या जीवनात,
ते दुःख मज जागे ठेवतेय ।।

परमेश्वराच्या दृष्टीने,
माझा जन्म हीच होती एक चूक ।
देतो तयासच तो शिक्षा,
ज्याची असते जीवनात चूक ।।

दुःख न याचे की,
न कळावे तुजला, माझे मन ।
खरे दुःख याचेच की,
जन्मदात्या परमेश्वरासही, नसावी ती जाण ।।

नशीबाचे माझ्या दानच उलटे,
चूक करणाऱ्यासही माफ करते ।
अन् माझी चूक असो वा नसो,
शिक्षेचे भाग्य मलाच लाभते ।।

आजही आनंदी पाहून तुजला,
मन माझे भरुन पावते ।
त्या आनंदाचे मी नसावे कारण,
याचेच मनस्वी दुःख वाटते ।

का आहे माझे नसणेच, तुझ्या आनंदाचे रहस्य? ।
खरेच नव्हते का गं तुजला, माझ्यात काहीच स्वारस्य? ।।

आता निक्षुन टाळतो तुझे,
जुने नवे फोटोही पाहणे ।
पुन्हा चुकेल "हृदय" माझे,
गाईल तेच जुने तराणे ।।

सतत होती मज माझ्या,
हर घडल्या चुकिची जाणिव ।
परिक्षावे कधी तूही स्वतःस,
न रहावी तुझ्यात उणिव ।।

---- जयराज


शुक्रवार, २१ एप्रिल, २०१७

कविता : कलियुग

थोडिशी विद्रोही, थोडंसं व्यंग.
एकूण पुस्तकांमधून वाचलेलं वर्णन 
अन् दिसणारे वास्तव, आलेले अनुभव 
या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
त्यामुळे भावना दुखाविल्या गेल्या तर क्षमस्व...!!!



चूक असे कोणाची, कोणास होते शिक्षा,
हीच आहे खरी, कलियुगाची दीक्षा || १ ||

लफडी करुन आणती, आव जसा सज्जन,
ना नात्यांची तमा, न मर्यादेचे बंधन || २ ||

फेसबुक अन् व्हाॅट्सअॅप, यांनाच आलंय महत्व, 
आभासी या जगात, हरवून गेलंय सत्व || ३ ||

प्रेमाच्या नावाखाली, करती अश्लील चाळे,
पकडले जाता लावती, खोट्या नात्याचे टाळे || ४ ||

विश्वास देण्यासाठी काही, अग्निदिव्य करती, 
विश्वास राहिला दूरच, काही विश्वासघातच करती || ५ ||

माय-बाच्या गावी, गडी राहतो सासरी,
तळवे चाटत म्हणतो कसा, "खानदानी ओसरी" || ६ ||

चोराच्या आईसाठी, चोर असे राव,
रडून-रडून म्हणते कशी, "बाळ माझं साव" || ७ ||

चोराच्या आहेत, इथं उलट बोंबा,
न्यायाचीच बदनामी, कुठं तरी थांबा? || ८ ||

मानव अन् दानव, एक पंगतीला आले,
देवही हतबल, काय हे झाले...? || ९ ||

मानवाने दानवांवर, केली मोठी कडी,
दानवही शर्मसार, बसले मारुन दडी || १० ||

सज्जनांचे, विचारांचे, नाही काही काम,
दाम करी काम, येड्या, दुनिया करी सलाम || ११ ||

पैशांच्या जोरावर, करती काही शिक्षण,
आपली काय लायकी मग, ठेंगण त्यांसनी गगन || १२ ||

कलियुग असे श्रेष्ठ, सांगती शुकमुनी,
कर्माचे फळ तात्काळ, अशी त्याची करणी || १३ ||

आलो असलो जरी, कलियुगी जन्मा,
विसरु नये कधी, आपण रामनामा || १४ ||

जीवनाची नाव, अन् नावाडी रामप्रभू,
कलियुगातही नेतील तारुन, संसार सागरु || १५ ||


--- जयराज



बुधवार, १९ एप्रिल, २०१७

Horoscope

Have you ever wondered, those who believe in Sun Sign Horoscope, why the signs of Horoscope have a month in it? And more specifically, why they don't start from first day of the month? Why Aries starts with 21st of March and not with 1st January?

Let me answer these questions one-by-one, again, as per "my" study/thoughts. To answer these, we need to think upon some Geographical facts, we observe, in reference to the Sun. 


Everyone knows there are mainly 2 seasons, viz. Summer and Winter, in the world except few countries, such as India, Brazil and other lying in same latitudes, which have an extra Monsoon season. Most of us know that, these seasons are because of presence of the Sun in particular hemisphere of the Earth.
e.g.: If the Sun is at Northern Hemisphere, then the countries/continents lying to the North of an Equator, such as North America, Europe, large part of Asia etc., will experience Summer while, at the same time, Southern countries/continents, such as Australia, South America, Antarctica etc, will experience Winter. 


Latitudes and Longitudes are the imaginary lines drawn on the Earth surface/map, which divide the Earth in North-South and East-West quadrants, respectively.


Now, the question is, why the Sun moves in Northern and Southern Hemisphere of the Earth?
Simple answer is that, it is not the Sun but, the Earth, which is rotating around the Sun (which results a year) with revolving around its own axis (which results day and night) in West to East direction (which results the Sun to rise in the East and sets in the West) with axis of Rotation in North-South direction, has little tilted axis of rotation. Simply, the Earth does not have 
axis of rotation (around own) in exact North-South direction. This tilted axis of rotation causes the Earth to bend and lean back vertically (North-South direction) in front of the Sun to maintain the orbit of rotation around the Sun. Otherwise, the Earth will loose its orbit and may collide with other planets or the Sun. In result of this balance making act of the Earth, we see the movement of the Sun in different hemisphere of the Earth.


So, on March 21st of every year, the Sun appears to be in front of an Equator, 0 degrees latitude, showing exact 12 hrs. of day (time between Sunrise and Sunset) and 12 hrs. of night on the Earth, and from next day onward, the movement of the Sun is appeared to be in the Northern hemisphere. The Sun will continue to move in Northern hemisphere, till it reaches 23(1/2) degrees North latitude, which is popularly known as "Tropic of Cancer", and this happens to be on 21st of June. So, 21st of June is Big/Longest Day in Northern hemisphere. This journey is of 3 months. And causes complete Dark at extreme Southern hemisphere and a day of 24 hrs. on North pole. This means, the Sun does not rise on South Pole and does not set on North Pole for that day (and nearby days as well).


From next day onward, again, the Sun starts moving in South direction and on 22 September, it again reaches to Equator. From this day, the Sun starts moving in Southern hemisphere. This journey is of again 3 months to reach out 23(1/2) degrees South latitude, which is popularly known as "Tropic of Capricorn", i.e. on 22 December. This causes complete Dark on extreme Northern hemisphere and a day of 24 hrs. on South pole.


From 23 December, again the Sun starts its Northern journey of 3 months which completes on 21st March. And this completes a journey of 12 months i.e. a calendar year. 


Now, if you observe, the zodiac signs are 12 and also, time required for the Sun to make "visit" every part of the World/Earth is also 12 months. So, we can divide the Space, where the Sun appears to be moving, into 12 equal parts in which we can see the Sun at same location (or Part of Space), on particular day, every year.  Those parts are named with Zodiac Signs. So, in a way, the Sun can visit every zodiac sign (actually part) for an entire month. This gives the logical answer of "Why the signs of Horoscope have a month in it?"


Now, the question is, "Why not 1st of January?"
Of course, on 1st of January the Sun is in front of some specific latitude every year, but, it is not the Equator which is supposed to be Zero degrees i.e. at the center of the Earth Surface and which divides Earth into two equal hemisphere viz. North and South.


But, the Sun is at Equator for two dates 21st March and 22 September. Then why only 21st March is considered as a start and not 22 September? 

Yes, quite a valid and logical question. Now, as per me there are 3 answers for this question.

1. If you observe the map of the Earth, you will find, most of the countries and hence most of the World population, lies in Northern hemisphere. And hence, we might have considered Northern movement of the Sun first than Southern.


2. If you carefully observe the names we have given to 23(1/2) degrees North and 23(1/2) degrees South, then they appear to be "Tropic of Cancer" and "Tropic of Capricorn" respectively. And Horoscope of sign Cancer starts from 21st June while that of Capricorn is 22 December, which are as per our above observations of movement of the Sun in different hemisphere of the Earth. I really have no idea what comes first, Horoscope or Tropic Names. 😉😉


3. And most important and more appropriate reason is constellation (Nakshatras). Actually, my above description is just to clarify the movement of the Sun in the sky. If we look at the clear sky in the dark night, like I said before, in the parts of the sky (where the Sun appears to be moving and which are named as Zodiac signs), we can see different constellations form a particular symbol. And those symbols are nothing but Zodiac symbols. Moreover, the Zodiac signs are named as per these symbols only.

e.g.: On 21st March night (till 20th April), if we look at the sky, in the region of the Sun, we should see the Aries shape and so on.

I used to see sky every night, but, due to my lack of imagination or not having clear sky, being in the city, I don't see such shapes. But, it is said that, at country-side, we can see these miracle in the sky.


But, this (Constellation explanation) is not matching exactly with Vaidik Jyostish, which is popularly known as Patrika or Kundli, that actually works on Constellation positions. The dates are not exact. 

e.g.: My birth date is 27th May. So, the Sun in my Kundli must be in Gemini as per Horoscope and our above Sun transit explanations. But, it is situated in Taurus. 

This Sun transition is on 14th of every month, as per Kundli. I need to study it a bit more. But, our Sun transition explanation and month in Horoscope is still valid. Just few correction/assumptions to match with Vaidik Jyotish is needed.

These constellations are not only used by Astrologers, but also, Astronomers to identify the location of different stars or astronomical objects in the universe.


Hope this would have given the rough idea of "Why Horoscope has months in it?"


Moreover, if you closely look at the Indian Solar/Marathi calendar, which has a start of New Year, popularly named "Gudi-Padwa", nearer to 21st March, except few years which are, I guess, next to "Adhik-Maas".


***Adhik-Maas : In English calendar, we have an extra day in every leap year (29 February). But, all Marathi months are of 30 days and we have an extra month of 30 days after every 3 years, which is popularly known as, "Adhik-Maas" or "Mal-Maas" or "Dhondaa Mahinaa"


In the end, again, I'm mentioning that, the above explanation of "Month in a Horoscope" is purely my thoughts/conclusion. Here, I tried to bind Geographical/Astronomical facts with Astrology/Horoscope. The original reason may be different. Also, I don't want to boost any kind of Superstitions.





Horoscope [मराठी]

आपण कधी विचार केला आहे का, जे सूर्य राशींवर विश्वास ठेवतात, कि त्या राशी नेमक्या महिन्यांमध्येच कशा येतात? आणि विशेषतः, त्या पहिल्या तारखेपासून का नाही सुरु होत? का मेष राशीची सुरुवात १ जानेवारीपासून न होता २१ मार्च पासून होते?

चला, मी आता वरील प्रश्नांची "माझ्या" अभ्यास/विचारां नुसार उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी, आपल्याला सूर्याच्या अनुषंगाने काही भौगोलिक बाबींचा विचार करावा लागेल. 

सर्व जगात केवळ २च ऋतू मानले जातात आणि ते म्हणजे उन्हाळा आणि हिवाळा, अपवाद केवळ भारत, ब्राझील आणि त्यांच्या अक्षांशामधील देशांचा ज्यांमध्ये पावसाळा हा एक ज्यादा ऋतू असतो. 
आपल्यापैकी बरेच जण हे सुद्धा जाणून असतील कि, हे ऋतू निर्माण होण्यामागे सूर्याचे पृथ्वीच्या उत्तर किंवा दक्षिण गोलार्धात असणे कारणीभूत आहे. 
उदा. : सूर्य जर पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात असेल, तर जे देश/खंड विषुववृत्ताच्या (शून्य अंश अक्षवृत्त) उत्तरेकडे आहेत, जसे उत्तर अमेरिका, युरोप, आशिया खंडाचा बराचसा भाग इ., तेथे उन्हाळा असेल आणि त्याच कालावधीत दक्षिण गोलार्धातील देश/खंडांत, जसे दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अंटार्टिका इ., ठिकाणी हिवाळा असेल. 

अक्षवृत्त आणि रेखावृत्त या काल्पनिक रेखा असून त्या पृथ्वीला अनुक्रमे दक्षिण-उत्तर आणि पूर्व-पश्चिम भागात विभागतात. 

आता प्रश्न असा निर्माण होतो कि, सूर्य उत्तर आणि दक्षिण गोलार्धात फिरताना का दिसतो?
याच सरळ, साधं आणि सोपं उत्तर म्हणजे, मुळात सूर्य स्थिर असून तो पृथ्वीच्या गोलार्धात फिरत नाहीच (केवळ स्वतःभोवती फिरतो). परंतु, पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असताना (ज्याचा परिणाम आपले वर्ष असते), स्वतःभोवतीही फिरत असते (ज्याच्या परिणामस्वरूप आपल्याला दिवस आणि रात्र दिसते). पृथ्वीचे हे स्वतःभोवतीचे फिरणे पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे (त्यामुळे आपल्याला सूर्य पूर्वेकडून उगवला आणि पश्चिमेकडे मावळला असे दिसते.) आणि तिचा स्वतःभोवती फिरण्याचा अक्ष दक्षिणोत्तरअसून तिचा हा स्वतःभोवती फिरण्याचा अक्ष (Axis of Rotation) थोडासा कललेला आहे. अशा या कललेल्या अक्षामुळे, सूर्याभोवती ठरलेल्या कक्षेत तसेच स्वतःभोवती फिरताना पृथ्वीला तोल सांभाळण्यासाठी दक्षिणोत्तर (सूर्यसापेक्ष पुढे-मागे) झुकावे लागते. अन्यथा पृथ्वी आपली कक्षा भटकून इतर ग्रहांना किंवा सूर्याला जाऊन धडकेल. या पृथ्वीच्या तोल सांभाळणाऱ्या कृतीमुळेच आपल्याला सूर्य कधी उत्तर तर कधी दक्षिण गोलार्धात फिरताना दिसतो. 

तर, प्रत्येक वर्षाच्या २१ मार्च या दिवशी, सूर्य शून्य अंश अक्षवृत्त अर्थात विषुववृत्तासमोर दिसतो, ज्यामुळे या दिवशी पृथ्वीवर बरोबर १२ तासांचा दिवस (सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंतचा काळ) व १२ तासांची रात्र असते आणि दुसऱ्या दिवसापासून सूर्य उत्तरेकडे सरकताना दिसू लागतो. असा उत्तर गोलार्धात सूर्य फिरत असता तो २३(१/२) अंश उत्तरेपर्यंत, ज्याला "कर्कवृत्त" असेही म्हणतात, तिथपर्यंत जातो. थोडक्यात पृथ्वी कर्कवृत्त सूर्यासमोर येई पर्यंत झुकते आणि हा दिवस असतो २१ जून. त्यामुळे २१ जून हा उत्तर गोलार्धातील मोठा दिवस असतो. सूर्याचा हा प्रवास सलग ३ महिन्यांचा असतो आणि यामुळे दक्षिण ध्रुवावर २४ तासांची रात्र तर उत्तर ध्रुवावर २४ तासांचा दिवस आढळतो. याचाच अर्थ असा कि, त्या दिवशी (आणि लगतचे काही दिवस), उत्तर ध्रुवावर सूर्य काही मावळत नाही तर दक्षिण ध्रुवावर सूर्य काही उगवत नाही. 


पुन्हा दुसऱ्या दिवसापासून सूर्याचे दक्षिणेकडे प्रयाण सुरु होते व २२ सप्टेंबर रोजी तो पुन्हा विषुववृत्तासमोर येतो. यानंतर सूर्याचा दक्षिण गोलार्धातला प्रवास सुरु होतो. पुन्हा ३ महिन्यांचा प्रवास करून सूर्य २३(१/२) अंश दक्षिण, ज्याला "मकरवृत्त" असेही म्हणतात, पर्यन्त जातो आणि ती तारीख असते २२ डिसेंबर. यामुळे आता दक्षिण ध्रुवावर २४ तासांचा दिवस तर उत्तर ध्रुवावर २४ तासांची रात्र दिसते. 

नंतर २३ डिसेंबर पासून पुन्हा सूर्य उत्तरेकडे सरकू लागतो आणि शेवटी २१ मार्च रोजी पुन्हा विषुववृत्तावर येतो. असे आपले १२ महिन्यांचे एक पूर्ण वर्ष सरते. 

आता जर तुमच्या लक्षात असेल कि, राशी १२ आहेत आणि सूर्यालाही पृथ्वीच्या सर्व भागांना भेट देण्यासाठी १२ महिन्यांचाच कालावधी लागतो. मग पृथ्वीवरून दिसणारे आकाश आपण १२ सामान भागांमध्ये विभागले असता, दर वर्षी, नेमक्या तारखेला सूर्य आपल्याला आकाशात नेमक्या जागीच दिसतो. मग त्या भागांनाच राशी म्हणून संबोधण्यात आले. तर अशाप्रकारे सूर्य प्रत्येक राशीला (आकाशातील भागांना) संपूर्ण महिना भेट देतो. अशाप्रकारे आपण "सूर्य राशींमध्ये महिने का असतात?" याचे तर्कशुद्ध उत्तर देऊ शकतो. 

आता आपण बघुयात "१ जानेवारी" हि तारीख का नाही?
नक्कीच दरवर्षी १ जानेवारीला सूर्य एका विशिष्ठ अक्षवृत्तासमोरच असेल, पण ते विषुववृत्त, ज्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागाचे उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध असे समान भाग पडतात, ते नसेल. 

पण, सूर्य विषुववृत्तासमोर वर्षातील दोन दिवस, २१ मार्च आणि २२ सप्टेंबर, असतो. मग, २१ मार्चच का सुरुवात मानावी?
अतिशय योग्य आणि तर्कशुद्ध प्रश्न. याचे माझ्यानुसार ३ उत्तरं देता येतील. 

१. जर आपण पृथ्वीचा नकाशा नीट पहिला असेल तर आपल्या असं लक्षात येईल कि पृथ्वीवर जमिनीचा मोठा भाग आणि त्यामुळे जगाची एक मोठी लोकसंख्या, उत्तर गोलार्धात आढळते आणि त्यामुळेच कदाचित आपण सूर्याचे उत्तर गोलार्धातील भ्रमण आधी मानत असू. 

२. जर तुम्ही २३(१/२) उत्तर आणि दक्षिण यांची नावं पहिली तर अनुक्रमे ती, "कर्कवृत्त" आणि "मकरवृत्त" अशी दिसतील आणि सूर्य राशींमधील कर्क राशीची सुरुवात पण २१ जून तर मकर राशीची सुरुवात २२ सप्टेंबर पासूनच होते जे आपण वर पाहिलेल्या सूर्याच्या भ्रमणाशी तंतोतंत जुळते. पण या सर्वात, मला खरंच हि कल्पना नाही कि आधी काय, सूर्य राशी कि या अक्षवृत्तांची नावं? 😉😉

३. आणि सगळ्यात महत्वाचे आणि योग्य उत्तर म्हणजे नक्षत्रं. खरं तर माझे वरील वर्णन हे केवळ तुम्हांला सूर्याचे आकाशातील फिरणे समजावे यासाठी होते. जर आपण एखाद्या अंधाऱ्या रात्री (अवसेच्या) आकाशाकडे पाहिले, तर आपल्याला काही नक्षत्रं एकत्र करून काही आकार पाहायला मिळतील आणि जसे मी वरती सांगितले आहे, ते आकाशाच्या विविध भागात (सूर्य फिरण्याचे जे आपण केले ते) दिसून येतील. ते आकार राशींच्या बोधचिन्हांसारखे दिसतील. किंबहुना यांवरूनच राशींना ती नावे देण्यात आली आहेत. 
उदा. २१ मार्च (ते जवळपास २० एप्रिल) या काळात रात्री आपल्याला आकाशात, सूर्याच्या पट्यात/भागात, मेंढ्यासारखा (मेष राशीचे बोधचिन्ह) आकार दिसायला हवा. 

आता मला दररोज रात्री जरी आकाश पाहायचा छंद असला तरी, माझ्या कमी असलेल्या कल्पनाशक्तीमुळे म्हणा किंवा शहरात राहात असल्याने, मोकळं आकाश फारसं दिसत नसल्याने म्हणा, पण आजतागायत मला काही हे आकार दिसले नाहीत. पण असे म्हणतात कि, आजही गावांकडे हा अवकाशीय चमत्कार पाहू शकतो. 

पण हे वरील नक्षत्रांनुसार तारखेचे स्पष्टीकरण मी वैदिक ज्योतिष म्हणजे, पत्रिका किंवा जन्म-कुंडली, जे नक्षत्रांनुसार बघतात, मध्ये पडताळून पाहिले असता, ते तंतोतंत न जुळता, थोडी दिवसांची गडबड दिसून येत आहे.

उदा.: माझी जन्मतारीख २७ मे आहे. यानुसार, माझ्या पत्रिकेत, सूर्य राशी (Horoscope) आणि आपल्या वरील सूर्याच्या भ्रमणाच्या स्पष्टीकरणानुसार, सूर्य मिथुन राशीत असणे अपेक्षित आहे. पण तो वृषभ राशीत दिसून येतो. 

कुंडलीतील सूर्याचे भ्रमण प्रत्येक महिन्याच्या १४ तारखेला दिसून येते. मला यावर आणखी थोडा अभ्यास करणे अजूनही जरूरीचे आहे. पण आपण वर पाहिलेले सूर्याचे भ्रमण आणि सूर्य राशींमधील महिने यांचं स्पष्टीकरण वैधानिक/तार्किक/योग्य च आहे. फक्त वैदिक ज्योतिषाशी पडताळा करण्यासाठी काही दुरुस्तींची/गृहीतकांची गरज आहे. 

नक्षत्रांचा विचार केवळ ज्योतिषीच नाही तर खगोल-शास्त्रज्ञ सुद्धा एखाद्या ताऱ्याचे किंवा अवकाशीय घटकाचे अवकाशातील (ब्रह्माण्डातील) स्थान निश्चित करण्यासाठी करतात. 

आशा करतो कि "सूर्य राशींमध्ये महिना का असतो?" याच ढोबळमानाने उत्तर तुम्हाला मी देऊ शकलो. 

त्याही पुढे जाऊन, तुम्ही जर भारतीय सूर्य आणि मराठी दिनदर्शिका (कॅलेंडर) पाहिले तर असं लक्षात येईल कि, त्यांची नव-वर्षाची सुरुवात, ज्याला आपण "गुढी-पाडवा" म्हणून ओळखतो, हि २१ मार्चच्या जवळपासच असते. अपवाद केवळ त्या वर्षांचा ज्यांच्या आदल्या वर्षी "अधिक मास" आलेला असतो. 

*** अधिक मास : इंग्रजी दिनदर्शिकेप्रमाणे, लीप वर्षात, १ दिवस अधिक असतो (२९ फेब्रुवारी), तसे मराठी महिने सर्व ३० दिवसांचे असून, दर ३ वर्षांनी ३० दिवसांचा एक संपूर्ण महिनाच अधिक येतो, त्याला "अधिक-मास" किंवा "मल-मास" किंवा "धोंडा महिना" असेही म्हणतात. 

सरतेशेवटी, पुन्हा एकवार मला हे सांगावेसे वाटते कि, वरील "सूर्य राशींमधील महिने" यांचं स्पष्टीकरण पूर्णपणे माझ्या विचारांनी आहे. यामध्ये मी भौगोलिक/खगोलशास्त्रीय घटनांचा ज्योतिष/पत्रिका यांच्याशी मेळ घालण्याचा प्रयत्न केला आहे. याच मूळ कारण कदाचित वेगळेही असू शकेल. तसेच मला यातून कोणत्याही प्रकारच्या अंद्ध-श्रद्धेलाही खत-पाणी घालायचे नाही. 


मंगळवार, १८ एप्रिल, २०१७

कविता : तुझ्याप्रती

जे कारण दावून, दिलास मज तू नकार, 
त्या पेक्षाही मोठी, होती मजकडे हजार ।
फरक इतकाच होता, तुझा होता अहंकार,
अन् मी केले होते, प्रेम तुजवर अपार ।।१।।

सहज होते शक्य मला, तुला वाटेत सोडणे,
तुझे खोटे बोलणे, अन् ऐकून ते बहाणे ।
न केले मी तसे, जरी तुझे न पटले वागणे, 
अन् समजूनही घेतले, तुझे तोडून बोलणे ।।२।।

एकटीच तू नाही, जिने घेतले शिक्षण,
आठव सावित्रीबाई फुले, सोसले तुजसाठी मरण ।
दमड्या मोजून पदवी, नसते ते शिक्षण,
"विद्या विनयेन शोभते", करिती दुनिया नमन ।।३।।

विचारती आप्तेष्ट तुझे, "लग्ना-आधी बोलायचा, काय मज अधिकार?"
सांगू शकशील तू, केली होतीस सुरुवात, तूच अशी सुमार? 
"माणूस" म्हणून तुमच्या, दिला हर मागणीस रुकार,
विसरलात पक्ष आपला, भटाच्या ओसरीचा प्रकार ।।४।।

होईल हिम्मत तुझी, झाकण्या तुझ्या अंतरात?
कशी वागलीस कोठे, "सत्य" सांगशील आप्तांस? 
खोटेही वाटावे खरे, ढब तुझी वागण्यात,
कसा वाढला अविश्वास, घेतलीत माझी बाजू विचारात? ।।५।।

दिले मी तुला, प्रभू रामांचे उदाहरण,
प्राणांपलिकडे जाऊन, केले तुझे रक्षण ।
केवळ तुझ्याचसाठी, सोसले मी अपमान,
तरी न कळली प्रीत माझी, वद जाऊ कुणाला शरण? ।।६।।

सोड आता जाऊ दे, मी हि कोणाला सांगतोय?
माझे असे बोलणे, तुला प्रवचन वाटतेय ।
चाल तुझी खोटी, स्वप्न मोठी पाहतेय,
शरण जाऊन अहंकारा, दूर प्रेमास टाकतेय ।।७।।

येईल वेळ अशीही, वाटेल प्रेमाची गरज,
पैसा, सत्ताच न सर्व, मिळेल अशीही समज ।
हुडकेल पुन्हा मजला, व्याकुळ तुझी नजर,
नसेन पण मी कोठे, जाहला असेल उशीर ।।८।।

नव्हतोच मनात तुझ्या मी, न मी हे समजू शकलो,
"भाग्य थोर होणार माझी तू", तुझ्या स्वप्नातच रमलो ।
"नाहीस चुकीची मजसाठी तू", आठव, नित्यची मी वदलो,
घेऊन चूक आपुल्या शिरी, आयुष्यातून तुझ्या निघालो ।।९।।

---- जयराज 


रविवार, १६ एप्रिल, २०१७

कविता : कोणीतरी एखादा

जीवनात दुःख, प्रत्येकाच्याच असतं,
पण,
पावलो-पावली ते केवळ, एखाद्याच्याच असतं ।।१।।

दुःखाची तक्रार, प्रत्येकच करतो,
पण,
स्मित राखून दुःख, एखादाच झेलतो ।।२।।

प्रेमासाठी अश्रू, खूप जण ढाळतील,
पण,
अश्रू पिऊन प्रेम देणारा, एखादाच आढळेल ।।३।।

जीवनात आनंदी, खूप लोक दिसतील, 
पण,
दुसऱ्याच्या आनंदात आनंदी, एखादाच दिसेल ।।४।।

दुःखात हर-कोणी, आधार खांदा शोधेल,
पण,
दुःख सारुन आधार, एखादाच बनेल ।।५।।

गरज सरो वैद्य मरो, अनेकांना जमेल,
पण,
असे होऊनही मदतीला, एखादाच येईल ।।६।।

मन मारून जगणारे, फार असतात,
पण,
मेल्या मनात अंकुर फुलविणारा, एखादाच असतो ।।७।।

"माझं इतरांसारखं नाही", असे सर्वच म्हणतात,
पण,
तसे सिद्ध, एखादाच करून दाखवतो ।।८।।

असा एखादा, नशिबाने एखाद्यास भेटतो,
पण,
पितळ समजून सोने, कवडीमोल ठरतो ।।९।।

--- जयराज 


शुक्रवार, १४ एप्रिल, २०१७

कविता : उध्वस्त भावना

नव्हतीच कधी माझी, भूक शरीराची ।
मन माझे मात्र, उपाशीच मेले ।।

नसतो प्रत्येक प्रेमाचा, लग्नाने शेवट ।
माझे तर त्यातून, एकतर्फीचं होतं ।।

मन माझे बैचेन, तुझ्याविना आज-काल ।
बरसती अश्रूंच्या सरी, मनाच्या कोपऱ्यात ।।

असते खोटे प्रेमही, नव्हता मज अंदाज ।
दावून दिलेस तू ते, धन्यवाद तुज खास ।।

मूर्ख अडाण्यांच्या राज्यात, शतमूर्खास मानती हुशार ।
नसते मनुष्याची किंमत, ना नात्यांची जाण ।।

प्रेमात विश्वास देण्या, बांधती पवित्र नाती ।
नकोत पवित्र नाती, चारित्र्य नव्हे ती माती ।।

अहंकार, खोटा मिजास, अन् पोकळ वासा ।
पाहिल्याने उघडे हृदय, भावनाही तुझ्या मेल्या? ।।

बरेच झाले, संकट आले ।
आपले परके, उघड झाले ।।

न कवितेचे बोल, न शब्द सुरात ।
क्षमा याचून ऐकवितो, उध्वस्त भावना ।।

---- जयराज 


गुरुवार, ६ एप्रिल, २०१७

कविता : स्वप्न-परी

आली होती एक परी, एकदा माझ्या जीवनात ।
पाहताच तिला वेडा मी, भरली होती मनात ।।१।।

गोरापान रंग तिचा, गोबरे गोबरे गाल ।
हसरे गुलाबी ओठ तिचे, राणीवानी चाल ।।२।।

काळे लांब केस तिचे, डोळे वाटे शांत ।
सुगंधी नाजूक काया तिची, माझे मन अशांत ।।३।।

तिच्या मोहक अदेपुढे, सारे जग कुर्बान ।
रूपगर्विता होती ती, खरे मेक-अपचे दुकान ।।४।।

माझ्याकडे पाहून मात्र, थोडी हसून लाजली ।
वेडे मन सांगे माझे, हसली म्हणजे फसली ।।५।।

हिय्या करून मीही मग, केला तिला प्रश्न ।
"होशील का राणी माझी, करशील मजशी लग्न?" ।।६।।

हसून तिने दिला होकार, मी झालो बेभान ।
दिवस-रात्र तिचाच विचार, हरली भूक-तहान ।।७।।

काळ धावे वाऱ्यावानी, जवळ लग्नाची तारीख ।
बिनसले आहे तिचे काही, शंका आली बारीक ।।८।।

"काय झालं राणी तुला, सांगशील का मज एकदा?" ।
ती म्हणाली, "राजा हवा, तू तर खूपच साधा" ।।९।।

"नाही तुजकडे गाड्या महाल, नाही पैसा संपत्ती" ।
"का दिला होकार तुला, कशी झाली दुर्बुद्धी?" ।।१०।।

"नको करुस असे प्रिये", मी तिला विनविले ।
तोऱ्यात मला सोडून गेली, एक न माझे ऐकले ।।११।।

खोटी आशा दाऊन मला, तिने दिला दगा ।
स्वप्न-परी गायब झाली, झालो झोपेतून जागा ।।१२।।

स्वप्न होते सारे ते, खोटे होते प्रेम ।
स्वप्न काय अन् सत्य काय, त्याचा लागेना नेम ।।१३।।

---- जयराज 




मंगळवार, ४ एप्रिल, २०१७

मला भावलेले प्रभू श्रीराम [ राम-नवमी विशेष ]

चैत्राची पहाट... कोकीळ पक्ष्याचे "कुहू-कुहू" वसंत ऋतूचे आगमन झाल्याची वार्ता देते आणि मग वेध लागतात ते "राम नवमीचे...!!!"

बुध कौशिक ऋषी या सर्व गोष्टींचे आपल्या "राम-रक्षा" स्तोत्रातील एका श्लोकात इतके उत्कृष्टपणे वर्णन करतात,

कुजतं राम रामेती ,मधुरं मधुराक्षरं ।
आरूह्य कविता शाखां, वंदे वाल्मिकी कोकिलं ।।

अर्थ: कवितेच्या शाखेवर आरूढ होऊन, राम-राम अशा मधुर अक्षरांचा मधुरपणे कुंजन (जप) करणाऱ्या कोकीळरूपी वाल्मिकी ऋषींना नमस्कार असो. 
वाल्मिकी ऋषींनी रामायण पद्य (कविता/सुभाषित/श्लोक) स्वरूपात लिहिले असल्याने रामायणाचा "कविता शाखा" तर वाल्मिकींचा कोकीळ असा सुंदर उल्लेख बुध कौशिक ऋषी करतात. 

हजारो वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या एका वीर, पराक्रमी, प्रजाहितदक्ष राजाची आजही जगाला का भुरळ पडावी? हाच एक संशोधनाचा विषय आहे आणि या संशोधनातूनच लागतो श्रीरामांचा शोध. 

रामरक्षा स्तोत्रात रामनामाचे वर्णन असे आहे,

राम रामेती रामेती, रमे रामे मनोरमे ।
सहस्त्रनाम ततुल्यं, रामनाम वरानने ।।

अर्थात, राम राम असा जप करत त्यामध्ये मन रमविणे हे विष्णुंच्या सहस्त्र नाम जपण्यासारखे आहे.

काही लोक श्रीरामांना श्रीविष्णूचा ७वा अवतार मानतात. हि त्यांच्या श्रद्धेची बाब आहे. तत्कालीन जनधारणेनुसार राजा हा भूपती असून त्याला श्रीविष्णूचे रूपही (रूपकात्मक) मानले जात असे. मला त्यावर काही एक टिप्पणी करायची नाही. पण मी "प्रभू" हा शब्द केवळ त्या अर्थाने नाही वापरला तर माझ्या मते प्रभू श्रीराम म्हणजे "करणी करेगा तो नर का नारायण बन जायेगा" या उक्तीचे साक्षात उदाहरण आहेत आणि म्हणूनच मला "प्रभू" पेक्षा दुसरं कोणतंही विशेषण लावावसं वाटलं नाही, वाटतही नाही.  

प्रभू श्रीराम माझ्यासाठी खरंच खूप खास आहेत. माझ्या उजाड, अनपेक्षित चढ-उतार, यशापयशाच्या जीवनात "राम" आणण्याचे श्रेय केवळ प्रभू श्रीरामांनांच आहे. त्यांची जीवनशैली, थोरा-मोठ्यांना, आई-वडिलांना मान देण्याची त्यांची वृत्ती, एक-पत्नीव्रत, एक वचनी, सत्यवचनी, सदाचार, ध्येयासक्ती, निगर्वीपणा, सज्जनता, आदर्शवाद असे किती गुण वर्णू? माझे केवळ डोळेच भरून येतात त्यांच्या नावाने. 

"पायोजी मैने राम रतन धन पायो"

हे संत मीराबाईंच भजन तर मी अखंड कित्येक तास तल्लीनतेने ऐकू शकतो. त्या भजनातील,

"सत कि नाव खिवटींया सतगुरु, भवसागर तर आयो" 

या बोलाने तर मी पार घायाळ झालो आहे. मी प्रभू श्रीरामांनाच माझे गुरु मानतो आणि ते माझा संंसार सागर पार करण्यात नक्की मदत करतील असा माझा पक्का विश्वास आहे. या बाबतीतील केवट नावाड्याची गोष्ट तर प्रसिद्धच आहे. ज्यांना माहित नाही, त्यांच्यासाठी ती थोडक्यात सांगतो. 

प्रभू श्रीराम वनवासाला निघाले तेव्हाची गोष्ट. त्यांना वाटेत गंगा नदीचे विशाल पात्र पार करायचे होते. ते पार करण्यासाठी त्यांनी केवट नावाड्याची नाव घेतली. पण कोणाला तरी आपल्या नावाचा, हुद्याचा वापर करून फुकटात काम करवून घेणारे प्रभू श्रीराम कुठले? त्यांनी केवट नावाड्याला बिदागी बद्दल विचारले असता, खरंच, श्रेष्ठता समजायलाही अंगी श्रेष्ठत्व असावं लागत, त्यांनी जे उत्तर दिलं ते खरंच खूप आदर्श होतं. केवट म्हणाले, "हे प्रभू, मी तुमचा गंगा पार करायचा नावाडी होतो, तुम्ही माझे संसार सागर पार करणारे नावाडी व्हा...!!!" 

इतकी भक्ती, इतकी बुद्धी आणि समोरच्याला ओळखण्याची पात्रता केवळ प्रभू श्रीरामांच्या व्यक्तिमत्वाने आणि प्रभावानेच येऊ शकते. 

प्रभू श्रीरामांचे संपूर्ण आयुष्य पाहिले तर एकही दैवतुल्य म्हणावा असा चमत्कार न दाखविता, केवळ आदर्शवत जीवनजगून, देवपदाला पोहोचणारी एक सर्वसामान्य व्यक्ती असे आपण म्हणू शकतो. आता काही जण यावर मला त्यांचे "शिवधनुष्य" उचलणे किंवा मोडणे आणि पाण्यावर तरंगत्या दगडांचा "रामसेतू" बांधणे हे चमत्कार म्हणून दाखवतील. पण मला ते चमत्कार वाटत नाहीत. कारण "शिवधनुष्य" उचलणे खरंच चमत्कार करण्यासारखे असते तर तो पण जनक राजांनी का लावला असता? आणि मग रावणासारख्या अनेक राजांनी तो पण पूर्ण करण्याचा प्रयत्न का केला असता? आजही आपण अचाट अशा कामास "शिवधनुष्य पेलणे" असे म्हणतो. पण तसे काम करणाऱ्या व्यक्तीला लगेच देवत्व बहाल करत नाही. आता राहता राहिला "पाण्यावर तरंगणाऱ्या दगडांपासून" समुद्रात "रामसेतू" बनविणे. तर तो बनविला नल आणि नील या वानरसेनेतील अभियंत्यांनी. त्याची गोष्टही अशी सांगितली जाते कि, सुरुवातीला जी दगडं समुद्रात टाकली ती बुडाली. म्हणून मग पवनसुत, रामभक्त हनुमंताने प्रभु श्रीरामांचे नाव घेऊन जेव्हा दगड पाण्यात टाकला तो न बुडता, पाण्यावर तरंगला. हा हनुमंताच्या भक्तीचा विजय होता आणि रामनाम तर मनुष्याला संसार सागर तारुन नेते हे आपण वरती केवट नावाड्याच्या कथेत पाहिलेच आहे. मग पाण्यावर दगड तरणे ही कोणती मोठी गोष्ट अन् चमत्कार...? हा तर रामनामाचा केवळ छोटा प्रभाव/दृष्टांत...!!! 

आणि विज्ञानानी अशा पाण्यावर तरंगणाऱ्या दगडाचा शोधही लावला आहे. त्याचे प्युमाईस (Pumice) असे नाव आहे. हा दगड लाव्हारसापासून बनलेला असून ज्वालामुखीच्या उद्रेकाने बाहेर येतो. 

सीता मातेला रावणाच्या तावडीतून सोडविण्यासाठी जात असताना वाटेत लागलेल्या समुद्राला हटविण्यासाठी प्रभू श्रीरामांनी आपल्या धनुष्याला बाण लावला, पण, "आपण हटून रस्ता करुन दिल्यास जलचरांचा नाश होईल" असे समुद्र देवतेने सांगताच, कनवाळू अन् एकबाणी (प्रत्यंच्याला बाण लागताच तो पुन्हा भात्यात न ठेवणे) असणाऱ्या प्रभूंनी तो बाण जवळच्या पर्वतावर चालवला आणि त्याचे तुकडे रामसेतू बांधण्यासाठी वापरले अशी अख्यायिका सांगितली जाते. असे दगड आजही रामेश्वरम् (रामसेतूची सुरुवात) आणि श्रीलंकेत सापडतात. 

पण या सर्वाचा अर्थ मला प्रभू श्रीरामांना देवत्व बहाल करायचे नाही असा अजिबात नाही. किंबहूना प्रभूंना देवत्व बहाल करणारा मी कोण? माझी पात्रताही तितकी नाही. पण प्रभूंचे देवत्व हे त्यांच्या चमत्कारांमुळे नसून केवळ त्यांच्या सद्-गुणांमुळे आहे असे मला मनापासून वाटते.

त्यांच्या सद्-गुणांंचे काय आणि किती गुण वर्णावे...!!!

पित्याच्या आज्ञेनुसार शांतमनाने राज्याभिषेकाची तयारी करणारे प्रभू श्रीराम आणि राज्याभिषेकाच्या दिवशी पुन्हा पित्याच्या वचनासाठी तितक्याच शांतपणे वनवासास जाणारे श्रीराम...!!! राजा होणार म्हणून उन्माद नाही की वनवासात पाठवताय म्हणून अकांडतांडव अथवा बंडखोरी नाही. दोन्ही प्रसंगात तीच संयमता, तोच संतुलितपणा, तोच आदर...!!! खरंच किती वर्णन करावे या गुणाचे...!!! तरुण वयात, सर्व शक्तीमान असूनही, इतका संयम...!!! या त्यांच्या गुणामुळेच त्यांना "पुरुषोत्तम" म्हटले जाते.

अशी व्यक्ती भाऊ म्हणून असेल तर का लक्ष्मण त्यांच्या समवेत वनवासात न जाईल? अशा पतीसाठी का माता सीता महालांचा त्याग करुन जंगलात राहणे पसंत करणार नाहीत? अन् का अशा व्यक्तीच्या पादुका सिंहासनावर ठेवून, मिळालेले राजपद लाथाडून, भरतासारखा बंधू राज्य करणार नाही? 

प्रभू श्रीराम जन्मले सर्वसामान्यासारखे, वाढले एका राजपुत्रासारखे पण जगले एका आदर्शासारखे...!!! त्यांनी अवलंबिलेली कोणतीही गोष्ट आपल्याला आचरणात आणणे खरंच कठिण आहे का? किंबहूना व्यक्तीने सुखात आणि दुःखात आदर्श जीवन कसे जगावे याचाच धडा प्रभूंनी आपल्याला शिकविला. 

आपले आप्तेष्ट, सत्ता, संपत्तीच्या जोरावर सर्वसामान्य, संयमी वाटणाऱ्या प्रभू श्रीरामांना ललकारण्याचा प्रयत्न महाप्रतापी, महापंडित रावणाने केला. पण सर्व शक्तीमान, महासंयमी प्रभू रामचंद्रांनी वानरसेनेच्या मदतीने, रणात शौर्य गाजवून, त्याची शक्तीची, आप्तेष्टांची, संपत्तीची सारी घमेंड उतरवून त्यांसी वीरोचित अशी वीरगती प्राप्त करुन दिली. तसेच "मरणान्ती वैराणी" अर्थात वैर शरीराशी असून शरीराच्या मृत्युसमवेतच वैरही संपते असा आदर्श ठेवत बंधू लक्ष्मणाला मृत्युशय्येवरील रावणाकडून, महापंडिताकडून ज्ञान घेण्याचेही सांगितले. जिंकलेली लंका अयोध्येस न जोडता रावण बंधू बिभिषणास तेथील राजा बनवून केवळ सीतामातेस परत नेणारे प्रभू श्रीराम किती श्रेष्ठ म्हणावे...!!!

अशा आदर्शवत प्रभूंचे खुद्द शंभूंचा, महादेवांचा अवतार असणारे हनुमान निस्सिम भक्त बनावेत यांत नवल ते काय...!!!

वनवासाहून अयोध्येत परतल्यावरही ते प्रजेचे किती प्रेमाने पालन करीत होते याचे किती तरी दाखले देता येतील. म्हणूनच आजही आपण आदर्श राज्यपध्दतीसाठी "रामराज्य" असा शब्द वापरतो. 

कोणीतरी रावणाच्या कैदेत असलेल्या सीता माईंवर शंका उपस्थित केली तर ती निवारण्यासाठी, स्वतःचा सीतेवर असलेला विश्वास डावलून, माता सीतेला, प्राय:श्चित्तासाठी, पुन्हा वनवासात पाठविले. मनात आणले असते तर तर सार्वभौम, चक्रवर्ती प्रभू श्रीरामांनी शंका घेणाऱ्यास कठोरातील कठोर, राजद्रोहाची शिक्षा फर्मावली असती. पण प्रजेला आपल्या पुत्रवत मानणाऱ्या प्रभू श्रीरामांनी असे केले नाही. 

आणि माता सीतेबद्दल तर काय सांगावे? मिथिलेची राजकुमारी, रामपत्नी काय होते, केवळ पतीस वनवासाची आज्ञा असतानाही पत्नीधर्म निभाविण्यासाठी वनवास पत्करते, रावणाकडून अपहरण होऊनही तीचे शील भंग करण्याचे सामर्थ्य रावणात केवळ तीच्या पतिव्रता धर्मामुळेच न येते, अपहरण काळातही प्रभू श्रीरामांबद्दलचा माता सीतेचा अलौकिक विश्वास, वनवासाहून अयोध्येस परत आल्यावरही घेतल्या गेलेल्या शंकेवरुन पती आज्ञेनुसार, गर्भवती असतानाही, न घडलेल्या/केलेल्या चुकिचेही प्रायःश्चित घेण्यासाठी, पतीला विश्वास देण्यासाठी, पतीच्या शब्दांसाठी, पुन्हा वनवासास एकली निघते काय..!!! खरंच सारंच अलौकिक...!!! इतका सुंदर पत्नीधर्म केवळ माता सीताच निभावू शकते...!!! या सर्वात कधी कुठलीही तक्रार नाही कि पतीबद्दल एकही अनुद्-गार नाही...!!! पतीचा विश्वास संपादन करण्यासाठी किती अग्निदिव्यं केली सीतामाईंनी...!!! असे म्हणतात, त्याकाळात "शिवधनुष्य" लीलया हाताळण्याचं काम सीतामाई करत होत्या. म्हणूनच परशुराम ऋषींच्या आज्ञेवरून मिथिला नरेश जनकांनी सीता-स्वयंवरात "शिवधनुष्य" उचलून त्याला प्रत्यंचा जोडण्याचा पण लावला होता. इतकी महानता, माहेरची-सासरची श्रीमंती असूनही थोडासा तरी गर्व, अहंकार दिसतो का कुठे सीतामाईंच्या वागण्या-बोलण्यात? जितकी प्रभू श्रीरामांची महानता तितक्याच महान सीतामाईही...!!! खरेच महानता समजून घेण्याची पात्रता केवळ महान व्यक्तीतच असू शकते. प्रभू श्रीराम तर महान होते, आहेतच आणि त्यांचे कुटुंबही तितकेच महान होते, आहे.

खरंच एकमेकांवर प्रेम करावं तर प्रभू श्रीराम अन् सीतामाई सारखं.... अबोल, मोकळं, घनिष्ठ अन् एकनिष्ठ...!!!

स्वदेस चित्रपटातील "पल पल है भारी" हे गीत लिहणाऱ्या जावेद अख्तर यांंच करावं तितकं कौतुक थोडं आहे... रावण आणि माता सीता यांच्यातील संवादरुपात माता सीतेचे श्रीरामांवरील प्रेम, आदर, विश्वास इतका सुंदर अन् प्रभावीपणे त्यांनी मांडला आहे कि ऐकताना आपण तल्लीन होऊन डोळ्यांंत आसवे उभी राहतात.

अपहृत माता सीता अखंड रामनाम जपत असलेली पाहून त्या गाण्यात रावण सीतामाईला विचारतो, "असे रामाचे काय गुण आहेत ज्याने तू त्याचे सतत नामस्मरण करते आहेस?" त्यावेळेस त्या मानी पतिव्रतेने दिलेले उत्तर खरेच स्तब्ध करणारे आहे. त्या म्हणतात,

गीन पाएगा उन के गुण कोई क्या
इतने शब्दही कहाॅं है? ।।
पोचेगा उस शिखर पे कौन भला
मेरे रामजी जहाॅं है ।।
जग मैंं सबसे उत्तम है, 
मर्यादा पुरुषोत्तम है ।।
सबसे शक्तीशाली है, 
फिर भी रखते संयम है ।।

अन् असे गुणवर्णन करुन सीतामाता रावणाला सज्जड इशारा वजा भविष्याची जाणिव करुन देण्यासाठी पुढे म्हणतात,

पर उनकी संयम की अब आने को है सीमा,
रावण समय है... मांंग ले क्षमा... ।।

यावर रावण त्यांना उलट प्रश्न विचारतो, "इतकं सगळं खरं असेल तर मग श्रीराम का तुझी रक्षा करण्यास अजून आले नाहीत? बोल कोठे आहेत ते?"

अन् प्रकट होते सीतामातेचे प्रभू श्रीरामांवरील प्रेम..!!! त्या म्हणतात,

राम हृदय मैं है मेरे,
राम ही धडकन मैं है ।।
राम मेरी आत्मा मैं,
राम ही जीवन मैं है ।।

राम है हर पल मैं मेरे, 

राम है हर स्वास मैं ।। 
राम हर आशा मैं मेरी, 
राम है हर आस मैं ।।

किती सुंदर, किती अतुट, किती एकनिष्ठ...!!! पतीनिष्ठा असावी तर अशी...!!! आणि रावणाशी युध्द जिंकून माता सीतेला परत मिळविणारे, पुढे पुन्हा वनवासात माता सीता एकली गेली असली तरी, समाजमान्यता असूनही, आपले एक पत्नीव्रत जपत, विवाह न करणारे प्रभू श्रीराम... पत्नीनिष्ठा असावी तर अशी...!!! खरंच ही जोडी किती महान, किती पवित्र...!!!

आजही कधी मला एकटं, निराश, दुःखी वाटलं, तर मी श्रीराम चरित्राचीच आठवण काढतो अन् माझं दुःख, एकटेपण त्यांनी भोगलेल्या दुःखासमोर किती नगण्य आहे याची मला जाणीव होते. श्रीरामांना त्यांच्या दुःखात सावलीसारखी न पेक्षा त्यांच्या आत्म्यासारखी साथ सीतामाईंनी दिली होती. माझ्या आयुष्यात अशीच साथ केवळ श्रीरामांचीच आहे असे मी मनापासून मानतो. 

दक्षिणे लक्ष्मणो यस्य, वामे तु जनकात्मजा ।
पुरतो मारुर्ती यस्य, तंं वन्दे रघुनन्दनम् ।।

ज्याच्या उजव्या बाजूस लक्ष्मण तर डाव्या बाजूस जनकाची मुलगी (सीतामाई) आहे. पुढ्यात मारुती आहे, अशा रघुनंदनाला (प्रभू श्रीरामांना) माझा नमस्कार असो.

असे म्हणतात कि, प्रभू रामांच्या आशिर्वादाने रामभक्त हनुमान चिरंजीवी आहे. कधी हनुमंताची झालीच भेट तर मी केवळ एकच ईच्छा त्याच्याकडे मागेन ती म्हणजे "प्रभू श्रीरामांच्या दर्शनाची...!!!" थोडंसं कल्पनाविलासाकडे झुकणारी अन् अशक्यप्राय वाटणारी गोष्ट आहे ही. पण ईच्छा तर केवळ इतकीच बाकी आहे. 

अशा एकवचनी, सत्यवदनी, एकपत्नी, एकबाणी, संस्कारी,सद्-गुणी, महासंयमी, शक्तीमान, बुद्धीवान आणि अशा असंख्य आदर्श गुणांनी युक्त प्रभू श्रीरामांना कोटी-कोटी प्रणाम...!!! 

बोलो सियावर रामचंद्रजी कि जय...!!!


रविवार, २ एप्रिल, २०१७

कविता : माझा चंद्र

रात्रभर आकाशात मी, चंद्र बघत असतो,
त्यातही माझ्या चंद्राचाच, चेहरा मला दिसतो ||१||

जसे लागते चंद्राला, कधी-मधी ग्रहण,
तसे लागले नात्याला, आमच्याही एक ग्रहण ||२||

सुटते चंद्राचे ग्रहण, कारण तीट त्याचे डाग,
कसे सुटणार आमचे, माझा चंद्र बेदाग ||३||

अवसेची रात्र काळी, नाही दिसत चंद्र,
अंधारले जीवन माझे, गायब माझा चंद्र ||४||

चांदण्यांचा लख्ख प्रकाश, कितीही सुंदर पडला,
शोभा नाही देत, पण, चंद्राविन आकाशाला ||५||

चंद्राच्या एका दर्शनाला, तरसे जसा चकोर,
चंद्रासाठी माझ्या, मन माझे भाव-विभोर ||६||

होतो कधी थोडासा, चंद्र चकोरास निष्ठूर,
का राहिलाय चंद्र माझा, इतका वेळ दूर? ||७||

चकोर चिंती सुख, चंद्रास नसे खबर,
देह जरी नश्वर, प्रेम असे अमर ||८||

मिलन नसे त्यांंचे, आता मज उमजावे,
दूर राहून चकोराने, चंद्राचे सुख पहावे ||९||

---- एक चकोर (जयराज)