आली होती एक परी, एकदा माझ्या जीवनात ।
पाहताच तिला वेडा मी, भरली होती मनात ।।१।।
गोरापान रंग तिचा, गोबरे गोबरे गाल ।
हसरे गुलाबी ओठ तिचे, राणीवानी चाल ।।२।।
काळे लांब केस तिचे, डोळे वाटे शांत ।
सुगंधी नाजूक काया तिची, माझे मन अशांत ।।३।।
तिच्या मोहक अदेपुढे, सारे जग कुर्बान ।
रूपगर्विता होती ती, खरे मेक-अपचे दुकान ।।४।।
माझ्याकडे पाहून मात्र, थोडी हसून लाजली ।
वेडे मन सांगे माझे, हसली म्हणजे फसली ।।५।।
हिय्या करून मीही मग, केला तिला प्रश्न ।
"होशील का राणी माझी, करशील मजशी लग्न?" ।।६।।
हसून तिने दिला होकार, मी झालो बेभान ।
दिवस-रात्र तिचाच विचार, हरली भूक-तहान ।।७।।
काळ धावे वाऱ्यावानी, जवळ लग्नाची तारीख ।
बिनसले आहे तिचे काही, शंका आली बारीक ।।८।।
"काय झालं राणी तुला, सांगशील का मज एकदा?" ।
ती म्हणाली, "राजा हवा, तू तर खूपच साधा" ।।९।।
"नाही तुजकडे गाड्या महाल, नाही पैसा संपत्ती" ।
"का दिला होकार तुला, कशी झाली दुर्बुद्धी?" ।।१०।।
"नको करुस असे प्रिये", मी तिला विनविले ।
तोऱ्यात मला सोडून गेली, एक न माझे ऐकले ।।११।।
खोटी आशा दाऊन मला, तिने दिला दगा ।
स्वप्न-परी गायब झाली, झालो झोपेतून जागा ।।१२।।
स्वप्न होते सारे ते, खोटे होते प्रेम ।
स्वप्न काय अन् सत्य काय, त्याचा लागेना नेम ।।१३।।
---- जयराज

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा