नव्हतीच कधी माझी, भूक शरीराची ।
मन माझे मात्र, उपाशीच मेले ।।
नसतो प्रत्येक प्रेमाचा, लग्नाने शेवट ।
माझे तर त्यातून, एकतर्फीचं होतं ।।
मन माझे बैचेन, तुझ्याविना आज-काल ।
बरसती अश्रूंच्या सरी, मनाच्या कोपऱ्यात ।।
असते खोटे प्रेमही, नव्हता मज अंदाज ।
दावून दिलेस तू ते, धन्यवाद तुज खास ।।
मूर्ख अडाण्यांच्या राज्यात, शतमूर्खास मानती हुशार ।
नसते मनुष्याची किंमत, ना नात्यांची जाण ।।
प्रेमात विश्वास देण्या, बांधती पवित्र नाती ।
नकोत पवित्र नाती, चारित्र्य नव्हे ती माती ।।
अहंकार, खोटा मिजास, अन् पोकळ वासा ।
पाहिल्याने उघडे हृदय, भावनाही तुझ्या मेल्या? ।।
बरेच झाले, संकट आले ।
आपले परके, उघड झाले ।।
न कवितेचे बोल, न शब्द सुरात ।
क्षमा याचून ऐकवितो, उध्वस्त भावना ।।
---- जयराज

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा