आपण कधी विचार केला आहे का, जे सूर्य राशींवर विश्वास ठेवतात, कि त्या राशी नेमक्या महिन्यांमध्येच कशा येतात? आणि विशेषतः, त्या पहिल्या तारखेपासून का नाही सुरु होत? का मेष राशीची सुरुवात १ जानेवारीपासून न होता २१ मार्च पासून होते?
चला, मी आता वरील प्रश्नांची "माझ्या" अभ्यास/विचारां नुसार उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी, आपल्याला सूर्याच्या अनुषंगाने काही भौगोलिक बाबींचा विचार करावा लागेल.
सर्व जगात केवळ २च ऋतू मानले जातात आणि ते म्हणजे उन्हाळा आणि हिवाळा, अपवाद केवळ भारत, ब्राझील आणि त्यांच्या अक्षांशामधील देशांचा ज्यांमध्ये पावसाळा हा एक ज्यादा ऋतू असतो.
आपल्यापैकी बरेच जण हे सुद्धा जाणून असतील कि, हे ऋतू निर्माण होण्यामागे सूर्याचे पृथ्वीच्या उत्तर किंवा दक्षिण गोलार्धात असणे कारणीभूत आहे.
उदा. : सूर्य जर पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात असेल, तर जे देश/खंड विषुववृत्ताच्या (शून्य अंश अक्षवृत्त) उत्तरेकडे आहेत, जसे उत्तर अमेरिका, युरोप, आशिया खंडाचा बराचसा भाग इ., तेथे उन्हाळा असेल आणि त्याच कालावधीत दक्षिण गोलार्धातील देश/खंडांत, जसे दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अंटार्टिका इ., ठिकाणी हिवाळा असेल.
अक्षवृत्त आणि रेखावृत्त या काल्पनिक रेखा असून त्या पृथ्वीला अनुक्रमे दक्षिण-उत्तर आणि पूर्व-पश्चिम भागात विभागतात.
आता प्रश्न असा निर्माण होतो कि, सूर्य उत्तर आणि दक्षिण गोलार्धात फिरताना का दिसतो?
याच सरळ, साधं आणि सोपं उत्तर म्हणजे, मुळात सूर्य स्थिर असून तो पृथ्वीच्या गोलार्धात फिरत नाहीच (केवळ स्वतःभोवती फिरतो). परंतु, पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असताना (ज्याचा परिणाम आपले वर्ष असते), स्वतःभोवतीही फिरत असते (ज्याच्या परिणामस्वरूप आपल्याला दिवस आणि रात्र दिसते). पृथ्वीचे हे स्वतःभोवतीचे फिरणे पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे (त्यामुळे आपल्याला सूर्य पूर्वेकडून उगवला आणि पश्चिमेकडे मावळला असे दिसते.) आणि तिचा स्वतःभोवती फिरण्याचा अक्ष दक्षिणोत्तरअसून तिचा हा स्वतःभोवती फिरण्याचा अक्ष (Axis of Rotation) थोडासा कललेला आहे. अशा या कललेल्या अक्षामुळे, सूर्याभोवती ठरलेल्या कक्षेत तसेच स्वतःभोवती फिरताना पृथ्वीला तोल सांभाळण्यासाठी दक्षिणोत्तर (सूर्यसापेक्ष पुढे-मागे) झुकावे लागते. अन्यथा पृथ्वी आपली कक्षा भटकून इतर ग्रहांना किंवा सूर्याला जाऊन धडकेल. या पृथ्वीच्या तोल सांभाळणाऱ्या कृतीमुळेच आपल्याला सूर्य कधी उत्तर तर कधी दक्षिण गोलार्धात फिरताना दिसतो.
तर, प्रत्येक वर्षाच्या २१ मार्च या दिवशी, सूर्य शून्य अंश अक्षवृत्त अर्थात विषुववृत्तासमोर दिसतो, ज्यामुळे या दिवशी पृथ्वीवर बरोबर १२ तासांचा दिवस (सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंतचा काळ) व १२ तासांची रात्र असते आणि दुसऱ्या दिवसापासून सूर्य उत्तरेकडे सरकताना दिसू लागतो. असा उत्तर गोलार्धात सूर्य फिरत असता तो २३(१/२) अंश उत्तरेपर्यंत, ज्याला "कर्कवृत्त" असेही म्हणतात, तिथपर्यंत जातो. थोडक्यात पृथ्वी कर्कवृत्त सूर्यासमोर येई पर्यंत झुकते आणि हा दिवस असतो २१ जून. त्यामुळे २१ जून हा उत्तर गोलार्धातील मोठा दिवस असतो. सूर्याचा हा प्रवास सलग ३ महिन्यांचा असतो आणि यामुळे दक्षिण ध्रुवावर २४ तासांची रात्र तर उत्तर ध्रुवावर २४ तासांचा दिवस आढळतो. याचाच अर्थ असा कि, त्या दिवशी (आणि लगतचे काही दिवस), उत्तर ध्रुवावर सूर्य काही मावळत नाही तर दक्षिण ध्रुवावर सूर्य काही उगवत नाही.
पुन्हा दुसऱ्या दिवसापासून सूर्याचे दक्षिणेकडे प्रयाण सुरु होते व २२ सप्टेंबर रोजी तो पुन्हा विषुववृत्तासमोर येतो. यानंतर सूर्याचा दक्षिण गोलार्धातला प्रवास सुरु होतो. पुन्हा ३ महिन्यांचा प्रवास करून सूर्य २३(१/२) अंश दक्षिण, ज्याला "मकरवृत्त" असेही म्हणतात, पर्यन्त जातो आणि ती तारीख असते २२ डिसेंबर. यामुळे आता दक्षिण ध्रुवावर २४ तासांचा दिवस तर उत्तर ध्रुवावर २४ तासांची रात्र दिसते.
नंतर २३ डिसेंबर पासून पुन्हा सूर्य उत्तरेकडे सरकू लागतो आणि शेवटी २१ मार्च रोजी पुन्हा विषुववृत्तावर येतो. असे आपले १२ महिन्यांचे एक पूर्ण वर्ष सरते.
आता जर तुमच्या लक्षात असेल कि, राशी १२ आहेत आणि सूर्यालाही पृथ्वीच्या सर्व भागांना भेट देण्यासाठी १२ महिन्यांचाच कालावधी लागतो. मग पृथ्वीवरून दिसणारे आकाश आपण १२ सामान भागांमध्ये विभागले असता, दर वर्षी, नेमक्या तारखेला सूर्य आपल्याला आकाशात नेमक्या जागीच दिसतो. मग त्या भागांनाच राशी म्हणून संबोधण्यात आले. तर अशाप्रकारे सूर्य प्रत्येक राशीला (आकाशातील भागांना) संपूर्ण महिना भेट देतो. अशाप्रकारे आपण "सूर्य राशींमध्ये महिने का असतात?" याचे तर्कशुद्ध उत्तर देऊ शकतो.
आता आपण बघुयात "१ जानेवारी" हि तारीख का नाही?
नक्कीच दरवर्षी १ जानेवारीला सूर्य एका विशिष्ठ अक्षवृत्तासमोरच असेल, पण ते विषुववृत्त, ज्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागाचे उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध असे समान भाग पडतात, ते नसेल.
पण, सूर्य विषुववृत्तासमोर वर्षातील दोन दिवस, २१ मार्च आणि २२ सप्टेंबर, असतो. मग, २१ मार्चच का सुरुवात मानावी?
अतिशय योग्य आणि तर्कशुद्ध प्रश्न. याचे माझ्यानुसार ३ उत्तरं देता येतील.
१. जर आपण पृथ्वीचा नकाशा नीट पहिला असेल तर आपल्या असं लक्षात येईल कि पृथ्वीवर जमिनीचा मोठा भाग आणि त्यामुळे जगाची एक मोठी लोकसंख्या, उत्तर गोलार्धात आढळते आणि त्यामुळेच कदाचित आपण सूर्याचे उत्तर गोलार्धातील भ्रमण आधी मानत असू.
२. जर तुम्ही २३(१/२) उत्तर आणि दक्षिण यांची नावं पहिली तर अनुक्रमे ती, "कर्कवृत्त" आणि "मकरवृत्त" अशी दिसतील आणि सूर्य राशींमधील कर्क राशीची सुरुवात पण २१ जून तर मकर राशीची सुरुवात २२ सप्टेंबर पासूनच होते जे आपण वर पाहिलेल्या सूर्याच्या भ्रमणाशी तंतोतंत जुळते. पण या सर्वात, मला खरंच हि कल्पना नाही कि आधी काय, सूर्य राशी कि या अक्षवृत्तांची नावं? 😉😉
३. आणि सगळ्यात महत्वाचे आणि योग्य उत्तर म्हणजे नक्षत्रं. खरं तर माझे वरील वर्णन हे केवळ तुम्हांला सूर्याचे आकाशातील फिरणे समजावे यासाठी होते. जर आपण एखाद्या अंधाऱ्या रात्री (अवसेच्या) आकाशाकडे पाहिले, तर आपल्याला काही नक्षत्रं एकत्र करून काही आकार पाहायला मिळतील आणि जसे मी वरती सांगितले आहे, ते आकाशाच्या विविध भागात (सूर्य फिरण्याचे जे आपण केले ते) दिसून येतील. ते आकार राशींच्या बोधचिन्हांसारखे दिसतील. किंबहुना यांवरूनच राशींना ती नावे देण्यात आली आहेत.
उदा. २१ मार्च (ते जवळपास २० एप्रिल) या काळात रात्री आपल्याला आकाशात, सूर्याच्या पट्यात/भागात, मेंढ्यासारखा (मेष राशीचे बोधचिन्ह) आकार दिसायला हवा.
आता मला दररोज रात्री जरी आकाश पाहायचा छंद असला तरी, माझ्या कमी असलेल्या कल्पनाशक्तीमुळे म्हणा किंवा शहरात राहात असल्याने, मोकळं आकाश फारसं दिसत नसल्याने म्हणा, पण आजतागायत मला काही हे आकार दिसले नाहीत. पण असे म्हणतात कि, आजही गावांकडे हा अवकाशीय चमत्कार पाहू शकतो.
पण हे वरील नक्षत्रांनुसार तारखेचे स्पष्टीकरण मी वैदिक ज्योतिष म्हणजे, पत्रिका किंवा जन्म-कुंडली, जे नक्षत्रांनुसार बघतात, मध्ये पडताळून पाहिले असता, ते तंतोतंत न जुळता, थोडी दिवसांची गडबड दिसून येत आहे.
उदा.: माझी जन्मतारीख २७ मे आहे. यानुसार, माझ्या पत्रिकेत, सूर्य राशी (Horoscope) आणि आपल्या वरील सूर्याच्या भ्रमणाच्या स्पष्टीकरणानुसार, सूर्य मिथुन राशीत असणे अपेक्षित आहे. पण तो वृषभ राशीत दिसून येतो.
कुंडलीतील सूर्याचे भ्रमण प्रत्येक महिन्याच्या १४ तारखेला दिसून येते. मला यावर आणखी थोडा अभ्यास करणे अजूनही जरूरीचे आहे. पण आपण वर पाहिलेले सूर्याचे भ्रमण आणि सूर्य राशींमधील महिने यांचं स्पष्टीकरण वैधानिक/तार्किक/योग्य च आहे. फक्त वैदिक ज्योतिषाशी पडताळा करण्यासाठी काही दुरुस्तींची/गृहीतकांची गरज आहे.
नक्षत्रांचा विचार केवळ ज्योतिषीच नाही तर खगोल-शास्त्रज्ञ सुद्धा एखाद्या ताऱ्याचे किंवा अवकाशीय घटकाचे अवकाशातील (ब्रह्माण्डातील) स्थान निश्चित करण्यासाठी करतात.
आशा करतो कि "सूर्य राशींमध्ये महिना का असतो?" याच ढोबळमानाने उत्तर तुम्हाला मी देऊ शकलो.
त्याही पुढे जाऊन, तुम्ही जर भारतीय सूर्य आणि मराठी दिनदर्शिका (कॅलेंडर) पाहिले तर असं लक्षात येईल कि, त्यांची नव-वर्षाची सुरुवात, ज्याला आपण "गुढी-पाडवा" म्हणून ओळखतो, हि २१ मार्चच्या जवळपासच असते. अपवाद केवळ त्या वर्षांचा ज्यांच्या आदल्या वर्षी "अधिक मास" आलेला असतो.
*** अधिक मास : इंग्रजी दिनदर्शिकेप्रमाणे, लीप वर्षात, १ दिवस अधिक असतो (२९ फेब्रुवारी), तसे मराठी महिने सर्व ३० दिवसांचे असून, दर ३ वर्षांनी ३० दिवसांचा एक संपूर्ण महिनाच अधिक येतो, त्याला "अधिक-मास" किंवा "मल-मास" किंवा "धोंडा महिना" असेही म्हणतात.
सरतेशेवटी, पुन्हा एकवार मला हे सांगावेसे वाटते कि, वरील "सूर्य राशींमधील महिने" यांचं स्पष्टीकरण पूर्णपणे माझ्या विचारांनी आहे. यामध्ये मी भौगोलिक/खगोलशास्त्रीय घटनांचा ज्योतिष/पत्रिका यांच्याशी मेळ घालण्याचा प्रयत्न केला आहे. याच मूळ कारण कदाचित वेगळेही असू शकेल. तसेच मला यातून कोणत्याही प्रकारच्या अंद्ध-श्रद्धेलाही खत-पाणी घालायचे नाही.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा