चैत्राची पहाट... कोकीळ पक्ष्याचे "कुहू-कुहू" वसंत ऋतूचे आगमन झाल्याची वार्ता देते आणि मग वेध लागतात ते "राम नवमीचे...!!!"
बुध कौशिक ऋषी या सर्व गोष्टींचे आपल्या "राम-रक्षा" स्तोत्रातील एका श्लोकात इतके उत्कृष्टपणे वर्णन करतात,
कुजतं राम रामेती ,मधुरं मधुराक्षरं ।
आरूह्य कविता शाखां, वंदे वाल्मिकी कोकिलं ।।
अर्थ: कवितेच्या शाखेवर आरूढ होऊन, राम-राम अशा मधुर अक्षरांचा मधुरपणे कुंजन (जप) करणाऱ्या कोकीळरूपी वाल्मिकी ऋषींना नमस्कार असो.
वाल्मिकी ऋषींनी रामायण पद्य (कविता/सुभाषित/श्लोक) स्वरूपात लिहिले असल्याने रामायणाचा "कविता शाखा" तर वाल्मिकींचा कोकीळ असा सुंदर उल्लेख बुध कौशिक ऋषी करतात.
हजारो वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या एका वीर, पराक्रमी, प्रजाहितदक्ष राजाची आजही जगाला का भुरळ पडावी? हाच एक संशोधनाचा विषय आहे आणि या संशोधनातूनच लागतो श्रीरामांचा शोध.
रामरक्षा स्तोत्रात रामनामाचे वर्णन असे आहे,
राम रामेती रामेती, रमे रामे मनोरमे ।
सहस्त्रनाम ततुल्यं, रामनाम वरानने ।।
अर्थात, राम राम असा जप करत त्यामध्ये मन रमविणे हे विष्णुंच्या सहस्त्र नाम जपण्यासारखे आहे.
काही लोक श्रीरामांना श्रीविष्णूचा ७वा अवतार मानतात. हि त्यांच्या श्रद्धेची बाब आहे. तत्कालीन जनधारणेनुसार राजा हा भूपती असून त्याला श्रीविष्णूचे रूपही (रूपकात्मक) मानले जात असे. मला त्यावर काही एक टिप्पणी करायची नाही. पण मी "प्रभू" हा शब्द केवळ त्या अर्थाने नाही वापरला तर माझ्या मते प्रभू श्रीराम म्हणजे "करणी करेगा तो नर का नारायण बन जायेगा" या उक्तीचे साक्षात उदाहरण आहेत आणि म्हणूनच मला "प्रभू" पेक्षा दुसरं कोणतंही विशेषण लावावसं वाटलं नाही, वाटतही नाही.
प्रभू श्रीराम माझ्यासाठी खरंच खूप खास आहेत. माझ्या उजाड, अनपेक्षित चढ-उतार, यशापयशाच्या जीवनात "राम" आणण्याचे श्रेय केवळ प्रभू श्रीरामांनांच आहे. त्यांची जीवनशैली, थोरा-मोठ्यांना, आई-वडिलांना मान देण्याची त्यांची वृत्ती, एक-पत्नीव्रत, एक वचनी, सत्यवचनी, सदाचार, ध्येयासक्ती, निगर्वीपणा, सज्जनता, आदर्शवाद असे किती गुण वर्णू? माझे केवळ डोळेच भरून येतात त्यांच्या नावाने.
"पायोजी मैने राम रतन धन पायो"
हे संत मीराबाईंच भजन तर मी अखंड कित्येक तास तल्लीनतेने ऐकू शकतो. त्या भजनातील,
"सत कि नाव खिवटींया सतगुरु, भवसागर तर आयो"
या बोलाने तर मी पार घायाळ झालो आहे. मी प्रभू श्रीरामांनाच माझे गुरु मानतो आणि ते माझा संंसार सागर पार करण्यात नक्की मदत करतील असा माझा पक्का विश्वास आहे. या बाबतीतील केवट नावाड्याची गोष्ट तर प्रसिद्धच आहे. ज्यांना माहित नाही, त्यांच्यासाठी ती थोडक्यात सांगतो.
प्रभू श्रीराम वनवासाला निघाले तेव्हाची गोष्ट. त्यांना वाटेत गंगा नदीचे विशाल पात्र पार करायचे होते. ते पार करण्यासाठी त्यांनी केवट नावाड्याची नाव घेतली. पण कोणाला तरी आपल्या नावाचा, हुद्याचा वापर करून फुकटात काम करवून घेणारे प्रभू श्रीराम कुठले? त्यांनी केवट नावाड्याला बिदागी बद्दल विचारले असता, खरंच, श्रेष्ठता समजायलाही अंगी श्रेष्ठत्व असावं लागत, त्यांनी जे उत्तर दिलं ते खरंच खूप आदर्श होतं. केवट म्हणाले, "हे प्रभू, मी तुमचा गंगा पार करायचा नावाडी होतो, तुम्ही माझे संसार सागर पार करणारे नावाडी व्हा...!!!"
इतकी भक्ती, इतकी बुद्धी आणि समोरच्याला ओळखण्याची पात्रता केवळ प्रभू श्रीरामांच्या व्यक्तिमत्वाने आणि प्रभावानेच येऊ शकते.
प्रभू श्रीरामांचे संपूर्ण आयुष्य पाहिले तर एकही दैवतुल्य म्हणावा असा चमत्कार न दाखविता, केवळ आदर्शवत जीवनजगून, देवपदाला पोहोचणारी एक सर्वसामान्य व्यक्ती असे आपण म्हणू शकतो. आता काही जण यावर मला त्यांचे "शिवधनुष्य" उचलणे किंवा मोडणे आणि पाण्यावर तरंगत्या दगडांचा "रामसेतू" बांधणे हे चमत्कार म्हणून दाखवतील. पण मला ते चमत्कार वाटत नाहीत. कारण "शिवधनुष्य" उचलणे खरंच चमत्कार करण्यासारखे असते तर तो पण जनक राजांनी का लावला असता? आणि मग रावणासारख्या अनेक राजांनी तो पण पूर्ण करण्याचा प्रयत्न का केला असता? आजही आपण अचाट अशा कामास "शिवधनुष्य पेलणे" असे म्हणतो. पण तसे काम करणाऱ्या व्यक्तीला लगेच देवत्व बहाल करत नाही. आता राहता राहिला "पाण्यावर तरंगणाऱ्या दगडांपासून" समुद्रात "रामसेतू" बनविणे. तर तो बनविला नल आणि नील या वानरसेनेतील अभियंत्यांनी. त्याची गोष्टही अशी सांगितली जाते कि, सुरुवातीला जी दगडं समुद्रात टाकली ती बुडाली. म्हणून मग पवनसुत, रामभक्त हनुमंताने प्रभु श्रीरामांचे नाव घेऊन जेव्हा दगड पाण्यात टाकला तो न बुडता, पाण्यावर तरंगला. हा हनुमंताच्या भक्तीचा विजय होता आणि रामनाम तर मनुष्याला संसार सागर तारुन नेते हे आपण वरती केवट नावाड्याच्या कथेत पाहिलेच आहे. मग पाण्यावर दगड तरणे ही कोणती मोठी गोष्ट अन् चमत्कार...? हा तर रामनामाचा केवळ छोटा प्रभाव/दृष्टांत...!!!
आणि विज्ञानानी अशा पाण्यावर तरंगणाऱ्या दगडाचा शोधही लावला आहे. त्याचे प्युमाईस (Pumice) असे नाव आहे. हा दगड लाव्हारसापासून बनलेला असून ज्वालामुखीच्या उद्रेकाने बाहेर येतो.
सीता मातेला रावणाच्या तावडीतून सोडविण्यासाठी जात असताना वाटेत लागलेल्या समुद्राला हटविण्यासाठी प्रभू श्रीरामांनी आपल्या धनुष्याला बाण लावला, पण, "आपण हटून रस्ता करुन दिल्यास जलचरांचा नाश होईल" असे समुद्र देवतेने सांगताच, कनवाळू अन् एकबाणी (प्रत्यंच्याला बाण लागताच तो पुन्हा भात्यात न ठेवणे) असणाऱ्या प्रभूंनी तो बाण जवळच्या पर्वतावर चालवला आणि त्याचे तुकडे रामसेतू बांधण्यासाठी वापरले अशी अख्यायिका सांगितली जाते. असे दगड आजही रामेश्वरम् (रामसेतूची सुरुवात) आणि श्रीलंकेत सापडतात.
पण या सर्वाचा अर्थ मला प्रभू श्रीरामांना देवत्व बहाल करायचे नाही असा अजिबात नाही. किंबहूना प्रभूंना देवत्व बहाल करणारा मी कोण? माझी पात्रताही तितकी नाही. पण प्रभूंचे देवत्व हे त्यांच्या चमत्कारांमुळे नसून केवळ त्यांच्या सद्-गुणांमुळे आहे असे मला मनापासून वाटते.
त्यांच्या सद्-गुणांंचे काय आणि किती गुण वर्णावे...!!!
पित्याच्या आज्ञेनुसार शांतमनाने राज्याभिषेकाची तयारी करणारे प्रभू श्रीराम आणि राज्याभिषेकाच्या दिवशी पुन्हा पित्याच्या वचनासाठी तितक्याच शांतपणे वनवासास जाणारे श्रीराम...!!! राजा होणार म्हणून उन्माद नाही की वनवासात पाठवताय म्हणून अकांडतांडव अथवा बंडखोरी नाही. दोन्ही प्रसंगात तीच संयमता, तोच संतुलितपणा, तोच आदर...!!! खरंच किती वर्णन करावे या गुणाचे...!!! तरुण वयात, सर्व शक्तीमान असूनही, इतका संयम...!!! या त्यांच्या गुणामुळेच त्यांना "पुरुषोत्तम" म्हटले जाते.
अशी व्यक्ती भाऊ म्हणून असेल तर का लक्ष्मण त्यांच्या समवेत वनवासात न जाईल? अशा पतीसाठी का माता सीता महालांचा त्याग करुन जंगलात राहणे पसंत करणार नाहीत? अन् का अशा व्यक्तीच्या पादुका सिंहासनावर ठेवून, मिळालेले राजपद लाथाडून, भरतासारखा बंधू राज्य करणार नाही?
प्रभू श्रीराम जन्मले सर्वसामान्यासारखे, वाढले एका राजपुत्रासारखे पण जगले एका आदर्शासारखे...!!! त्यांनी अवलंबिलेली कोणतीही गोष्ट आपल्याला आचरणात आणणे खरंच कठिण आहे का? किंबहूना व्यक्तीने सुखात आणि दुःखात आदर्श जीवन कसे जगावे याचाच धडा प्रभूंनी आपल्याला शिकविला.
आपले आप्तेष्ट, सत्ता, संपत्तीच्या जोरावर सर्वसामान्य, संयमी वाटणाऱ्या प्रभू श्रीरामांना ललकारण्याचा प्रयत्न महाप्रतापी, महापंडित रावणाने केला. पण सर्व शक्तीमान, महासंयमी प्रभू रामचंद्रांनी वानरसेनेच्या मदतीने, रणात शौर्य गाजवून, त्याची शक्तीची, आप्तेष्टांची, संपत्तीची सारी घमेंड उतरवून त्यांसी वीरोचित अशी वीरगती प्राप्त करुन दिली. तसेच "मरणान्ती वैराणी" अर्थात वैर शरीराशी असून शरीराच्या मृत्युसमवेतच वैरही संपते असा आदर्श ठेवत बंधू लक्ष्मणाला मृत्युशय्येवरील रावणाकडून, महापंडिताकडून ज्ञान घेण्याचेही सांगितले. जिंकलेली लंका अयोध्येस न जोडता रावण बंधू बिभिषणास तेथील राजा बनवून केवळ सीतामातेस परत नेणारे प्रभू श्रीराम किती श्रेष्ठ म्हणावे...!!!
अशा आदर्शवत प्रभूंचे खुद्द शंभूंचा, महादेवांचा अवतार असणारे हनुमान निस्सिम भक्त बनावेत यांत नवल ते काय...!!!
वनवासाहून अयोध्येत परतल्यावरही ते प्रजेचे किती प्रेमाने पालन करीत होते याचे किती तरी दाखले देता येतील. म्हणूनच आजही आपण आदर्श राज्यपध्दतीसाठी "रामराज्य" असा शब्द वापरतो.
कोणीतरी रावणाच्या कैदेत असलेल्या सीता माईंवर शंका उपस्थित केली तर ती निवारण्यासाठी, स्वतःचा सीतेवर असलेला विश्वास डावलून, माता सीतेला, प्राय:श्चित्तासाठी, पुन्हा वनवासात पाठविले. मनात आणले असते तर तर सार्वभौम, चक्रवर्ती प्रभू श्रीरामांनी शंका घेणाऱ्यास कठोरातील कठोर, राजद्रोहाची शिक्षा फर्मावली असती. पण प्रजेला आपल्या पुत्रवत मानणाऱ्या प्रभू श्रीरामांनी असे केले नाही.
आणि माता सीतेबद्दल तर काय सांगावे? मिथिलेची राजकुमारी, रामपत्नी काय होते, केवळ पतीस वनवासाची आज्ञा असतानाही पत्नीधर्म निभाविण्यासाठी वनवास पत्करते, रावणाकडून अपहरण होऊनही तीचे शील भंग करण्याचे सामर्थ्य रावणात केवळ तीच्या पतिव्रता धर्मामुळेच न येते, अपहरण काळातही प्रभू श्रीरामांबद्दलचा माता सीतेचा अलौकिक विश्वास, वनवासाहून अयोध्येस परत आल्यावरही घेतल्या गेलेल्या शंकेवरुन पती आज्ञेनुसार, गर्भवती असतानाही, न घडलेल्या/केलेल्या चुकिचेही प्रायःश्चित घेण्यासाठी, पतीला विश्वास देण्यासाठी, पतीच्या शब्दांसाठी, पुन्हा वनवासास एकली निघते काय..!!! खरंच सारंच अलौकिक...!!! इतका सुंदर पत्नीधर्म केवळ माता सीताच निभावू शकते...!!! या सर्वात कधी कुठलीही तक्रार नाही कि पतीबद्दल एकही अनुद्-गार नाही...!!! पतीचा विश्वास संपादन करण्यासाठी किती अग्निदिव्यं केली सीतामाईंनी...!!! असे म्हणतात, त्याकाळात "शिवधनुष्य" लीलया हाताळण्याचं काम सीतामाई करत होत्या. म्हणूनच परशुराम ऋषींच्या आज्ञेवरून मिथिला नरेश जनकांनी सीता-स्वयंवरात "शिवधनुष्य" उचलून त्याला प्रत्यंचा जोडण्याचा पण लावला होता. इतकी महानता, माहेरची-सासरची श्रीमंती असूनही थोडासा तरी गर्व, अहंकार दिसतो का कुठे सीतामाईंच्या वागण्या-बोलण्यात? जितकी प्रभू श्रीरामांची महानता तितक्याच महान सीतामाईही...!!! खरेच महानता समजून घेण्याची पात्रता केवळ महान व्यक्तीतच असू शकते. प्रभू श्रीराम तर महान होते, आहेतच आणि त्यांचे कुटुंबही तितकेच महान होते, आहे.
खरंच एकमेकांवर प्रेम करावं तर प्रभू श्रीराम अन् सीतामाई सारखं.... अबोल, मोकळं, घनिष्ठ अन् एकनिष्ठ...!!!
स्वदेस चित्रपटातील "पल पल है भारी" हे गीत लिहणाऱ्या जावेद अख्तर यांंच करावं तितकं कौतुक थोडं आहे... रावण आणि माता सीता यांच्यातील संवादरुपात माता सीतेचे श्रीरामांवरील प्रेम, आदर, विश्वास इतका सुंदर अन् प्रभावीपणे त्यांनी मांडला आहे कि ऐकताना आपण तल्लीन होऊन डोळ्यांंत आसवे उभी राहतात.
अपहृत माता सीता अखंड रामनाम जपत असलेली पाहून त्या गाण्यात रावण सीतामाईला विचारतो, "असे रामाचे काय गुण आहेत ज्याने तू त्याचे सतत नामस्मरण करते आहेस?" त्यावेळेस त्या मानी पतिव्रतेने दिलेले उत्तर खरेच स्तब्ध करणारे आहे. त्या म्हणतात,
गीन पाएगा उन के गुण कोई क्या
इतने शब्दही कहाॅं है? ।।
पोचेगा उस शिखर पे कौन भला
मेरे रामजी जहाॅं है ।।
जग मैंं सबसे उत्तम है,
मर्यादा पुरुषोत्तम है ।।
सबसे शक्तीशाली है,
फिर भी रखते संयम है ।।
अन् असे गुणवर्णन करुन सीतामाता रावणाला सज्जड इशारा वजा भविष्याची जाणिव करुन देण्यासाठी पुढे म्हणतात,
पर उनकी संयम की अब आने को है सीमा,
रावण समय है... मांंग ले क्षमा... ।।
यावर रावण त्यांना उलट प्रश्न विचारतो, "इतकं सगळं खरं असेल तर मग श्रीराम का तुझी रक्षा करण्यास अजून आले नाहीत? बोल कोठे आहेत ते?"
अन् प्रकट होते सीतामातेचे प्रभू श्रीरामांवरील प्रेम..!!! त्या म्हणतात,
राम हृदय मैं है मेरे,
राम ही धडकन मैं है ।।
राम मेरी आत्मा मैं,
राम ही जीवन मैं है ।।
राम है हर पल मैं मेरे,
राम है हर स्वास मैं ।।
राम हर आशा मैं मेरी,
राम है हर आस मैं ।।
किती सुंदर, किती अतुट, किती एकनिष्ठ...!!! पतीनिष्ठा असावी तर अशी...!!! आणि रावणाशी युध्द जिंकून माता सीतेला परत मिळविणारे, पुढे पुन्हा वनवासात माता सीता एकली गेली असली तरी, समाजमान्यता असूनही, आपले एक पत्नीव्रत जपत, विवाह न करणारे प्रभू श्रीराम... पत्नीनिष्ठा असावी तर अशी...!!! खरंच ही जोडी किती महान, किती पवित्र...!!!
आजही कधी मला एकटं, निराश, दुःखी वाटलं, तर मी श्रीराम चरित्राचीच आठवण काढतो अन् माझं दुःख, एकटेपण त्यांनी भोगलेल्या दुःखासमोर किती नगण्य आहे याची मला जाणीव होते. श्रीरामांना त्यांच्या दुःखात सावलीसारखी न पेक्षा त्यांच्या आत्म्यासारखी साथ सीतामाईंनी दिली होती. माझ्या आयुष्यात अशीच साथ केवळ श्रीरामांचीच आहे असे मी मनापासून मानतो.
दक्षिणे लक्ष्मणो यस्य, वामे तु जनकात्मजा ।
पुरतो मारुर्ती यस्य, तंं वन्दे रघुनन्दनम् ।।
ज्याच्या उजव्या बाजूस लक्ष्मण तर डाव्या बाजूस जनकाची मुलगी (सीतामाई) आहे. पुढ्यात मारुती आहे, अशा रघुनंदनाला (प्रभू श्रीरामांना) माझा नमस्कार असो.
असे म्हणतात कि, प्रभू रामांच्या आशिर्वादाने रामभक्त हनुमान चिरंजीवी आहे. कधी हनुमंताची झालीच भेट तर मी केवळ एकच ईच्छा त्याच्याकडे मागेन ती म्हणजे "प्रभू श्रीरामांच्या दर्शनाची...!!!" थोडंसं कल्पनाविलासाकडे झुकणारी अन् अशक्यप्राय वाटणारी गोष्ट आहे ही. पण ईच्छा तर केवळ इतकीच बाकी आहे.
अशा एकवचनी, सत्यवदनी, एकपत्नी, एकबाणी, संस्कारी,सद्-गुणी, महासंयमी, शक्तीमान, बुद्धीवान आणि अशा असंख्य आदर्श गुणांनी युक्त प्रभू श्रीरामांना कोटी-कोटी प्रणाम...!!!
बोलो सियावर रामचंद्रजी कि जय...!!!

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा