खूप मोठी चूक केली,
कोणावर तरी विश्वास ठेऊन,
कोणाला तरी आपलं मानून,
अन् मनातल्या साऱ्या गोष्टी सांगून ।।
जीव लावून तुझं जाणं,
कदाचित सहन झालंही असतं ।
पण लावलेला जीव तोडून जाणं,
सावरणं खरंच अवघड असतं ।।
तुझ्या जाण्याने दिवस-रात्र, मी केवळ रडतोय ।
खरे प्रेम केल्याचीच, जणू किंम्मत मोजतोय ।।
दिसत नाहीत माझे अश्रु, आज ईथे कोणाला ।
माझ्या चुकिची मलाच शिक्षा, दोष न देतो कोणाला ।।
नाही मजला जाग ती आज, जेवायची अन् झोपायची ।
नाही मज ती शुध्दही आज, जगण्याची वा मरण्याची ।।
तुझे यायचे नाहीत रिप्लाय,
ते मला जागे ठेवायचे ।
आज नाहीस तू माझ्या जीवनात,
ते दुःख मज जागे ठेवतेय ।।
परमेश्वराच्या दृष्टीने,
माझा जन्म हीच होती एक चूक ।
देतो तयासच तो शिक्षा,
ज्याची असते जीवनात चूक ।।
दुःख न याचे की,
न कळावे तुजला, माझे मन ।
खरे दुःख याचेच की,
जन्मदात्या परमेश्वरासही, नसावी ती जाण ।।
नशीबाचे माझ्या दानच उलटे,
चूक करणाऱ्यासही माफ करते ।
अन् माझी चूक असो वा नसो,
शिक्षेचे भाग्य मलाच लाभते ।।
आजही आनंदी पाहून तुजला,
मन माझे भरुन पावते ।
त्या आनंदाचे मी नसावे कारण,
याचेच मनस्वी दुःख वाटते ।
का आहे माझे नसणेच, तुझ्या आनंदाचे रहस्य? ।
खरेच नव्हते का गं तुजला, माझ्यात काहीच स्वारस्य? ।।
आता निक्षुन टाळतो तुझे,
जुने नवे फोटोही पाहणे ।
पुन्हा चुकेल "हृदय" माझे,
गाईल तेच जुने तराणे ।।
सतत होती मज माझ्या,
हर घडल्या चुकिची जाणिव ।
परिक्षावे कधी तूही स्वतःस,
न रहावी तुझ्यात उणिव ।।
---- जयराज
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा