थोडिशी विद्रोही, थोडंसं व्यंग.
एकूण पुस्तकांमधून वाचलेलं वर्णन
अन् दिसणारे वास्तव, आलेले अनुभव
या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
अन् दिसणारे वास्तव, आलेले अनुभव
या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
त्यामुळे भावना दुखाविल्या
गेल्या तर क्षमस्व...!!!
चूक असे कोणाची, कोणास होते शिक्षा,
हीच आहे खरी,
कलियुगाची दीक्षा || १ ||
लफडी करुन आणती,
आव जसा सज्जन,
ना नात्यांची तमा, न मर्यादेचे बंधन || २ ||
फेसबुक अन् व्हाॅट्सअॅप,
यांनाच आलंय महत्व,
आभासी या जगात,
हरवून गेलंय सत्व
|| ३ ||
प्रेमाच्या
नावाखाली, करती अश्लील
चाळे,
पकडले जाता लावती,
खोट्या नात्याचे टाळे
|| ४ ||
विश्वास देण्यासाठी काही, अग्निदिव्य
करती,
विश्वास राहिला
दूरच, काही विश्वासघातच
करती || ५ ||
माय-बाच्या गावी,
गडी राहतो सासरी,
तळवे चाटत म्हणतो
कसा, "खानदानी ओसरी" || ६ ||
चोराच्या आईसाठी, चोर असे राव,
रडून-रडून म्हणते
कशी, "बाळ माझं
साव" || ७ ||
चोराच्या आहेत, इथं
उलट बोंबा,
न्यायाचीच
बदनामी, कुठं तरी
थांबा? || ८ ||
मानव अन् दानव,
एक पंगतीला आले,
देवही हतबल, काय
हे झाले...? || ९ ||
मानवाने दानवांवर, केली मोठी
कडी,
दानवही शर्मसार, बसले मारुन
दडी || १० ||
सज्जनांचे,
विचारांचे, नाही काही
काम,
दाम करी काम,
येड्या, दुनिया करी
सलाम || ११ ||
पैशांच्या
जोरावर, करती काही
शिक्षण,
आपली काय लायकी
मग, ठेंगण त्यांसनी गगन || १२ ||
कलियुग असे श्रेष्ठ,
सांगती शुकमुनी,
कर्माचे फळ तात्काळ,
अशी त्याची करणी
|| १३ ||
आलो असलो जरी,
कलियुगी जन्मा,
विसरु नये कधी,
आपण रामनामा || १४ ||
जीवनाची नाव, अन्
नावाडी रामप्रभू,
कलियुगातही
नेतील तारुन, संसार
सागरु || १५ ||
--- जयराज
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा